Join us

IPL 2021 : "धोनीचा तो सल्ला कामी आला आणि मी अखेरच्या षटकात षटकारांचा पाऊस पाडला," सर जडेजाने सांगितले गुपित

RCB Vs CSK : हर्षल पटेलने टाकलेल्या डावातील अखेरच्या षटकात महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni )दिलेला सल्ला बहुमूल्य ठरला, असे सामन्यानंतर रवींद्र जडेजाने सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 11:42 IST

Open in App

मुंबई - आयपीएलमध्ये काल दुपारी झालेल्या लढतीत धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सने विराट कोहलीच्य रॉयल चँलेंजर्स बंगळुरूवर दणदणीत विजय मिळवला. चेन्नईच्या या विजयात रवींद्र जडेजाची ( Ravindra Jadeja) अष्टपैलू खेळी निर्णायक ठरली. दरम्यान, हर्षल पटेलने टाकलेल्या डावातील अखेरच्या षटकात महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni )दिलेला सल्ला बहुमूल्य ठरला, असे सामन्यानंतर रवींद्र जडेजाने सांगितले. ( Ravindra Jadeja said, "MS Dhoni's advice worked and I hits sixes in the last over,")

सामना जिंकल्यानंतर रवींद्र जडेजा म्हणाला की, अखेरच्या षटकात हर्षल पटेलची रणनीती काय असेल हे मला धोनीने आधीच सांगितले होते. मी अखेरच्या षटकात कशी फटकेबाजी करायची याचा विचार  करत होतो. तेव्हा हर्षल पटेल अॉफस्टंपबाहेर चेंडू टाकणार असे माहीने मला सांगितले. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीसाठी मी आधीच तयार होतो. चेंडू बँटवर व्यवस्थित आला आणि मी धावसंख्या १९१ धावांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. अखेरीचे षटक आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होते. तसेच मी स्ट्राइकवर राहिलो तर अधिक धावा फटकावता येतील हेही मला माहिती होते, असेही त्याने सांगितले.

मी आज खेळाचा आनंद घेतला. जेव्हा तुम्ही खेळाचा आनंद घेता तेव्हा समाधान वाटते, असेही तो म्हणाला. दरम्यान, आजच्या विजयामुळे चेन्नई सुपरकिंग्सचे पाच सामन्यात चार विजयांसह आठ गुण झाले आहेत. तसेच सरस धावगतीच्या जोरावर चेन्नई सध्या गुतालिकेत अव्वलस्थानी पोहोचली आहे.

टॅग्स :रवींद्र जडेजाआयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर