IPL 2021: धोनीनं RCB विरोधात उतरवला 'तुरूपचा एक्का', ५३ संघांकडून खेळण्याचा आहे अनुभव!

IPL 2021, CSK: चेन्नई सुपरकिंग्जचा (Channai Super Kings) संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या विरोधात मोठी चाल केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 05:21 PM2021-04-25T17:21:58+5:302021-04-25T17:24:46+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2021 ms dhoni included imran tahir in playing 11 against rcb play for 53 teams | IPL 2021: धोनीनं RCB विरोधात उतरवला 'तुरूपचा एक्का', ५३ संघांकडून खेळण्याचा आहे अनुभव!

IPL 2021: धोनीनं RCB विरोधात उतरवला 'तुरूपचा एक्का', ५३ संघांकडून खेळण्याचा आहे अनुभव!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, CSK: चेन्नई सुपरकिंग्जचा (Channai Super Kings) संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या विरोधात मोठी चाल केली आहे. धोनीनं आज चेन्नईच्या संघात एका अशा खेळाडूला आणलं की जो संघासाठी तुरूपचा एक्का आहे. चेन्नई सुपरकिंग्जचा हा जबरदस्त खेळाडू एक, दोन नव्हे, तर आतापर्यंत लीग स्पर्धांमध्ये एकूण ५३ संघांकडून खेळला आहे. (ipl 2021 ms dhoni included imran tahir in playing 11 against rcb play for 53 teams)

अनहोनी को होनी कर दे धोनी!, आजच्या निर्णयानं सर्वच बुचकळ्यात, २०१७ नंतर पहिल्यांदाच 'चमत्कार'

जगभरातील विविध स्टेडियम्सवर खेळण्याचा त्याचा अनुभव आहे आणि फिरकी गोलंदाजीतील एक जादुगर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात. अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या चेन्नई सुपरकिंग्जच्या संघात हा देखील अनुभवी आणि महत्वाचा गोलंदाज आहे. ४२ वर्षीच इम्रान ताहीर याचं आजच्या सामन्यात पुनरागमन होत आहे. धोनीनं मोईन अलीच्या जागीत इम्रान ताहीर याला संधी दिली आहे. 

IPL 2021: कोहलीचा पराभव नक्की, एमएस धोनीसाठी २५ एप्रिल तारीख आहे लकी!

उजव्या हाताचा फिरकीपटू इम्रान ताहीरनं इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. २०१९ सालच्या आयपीएलमध्ये इम्रान खाननं धुमाकूळ घातला होता. २०१९ सालच्या आयपीएलमध्ये ताहीर सर्वाधिक २६ विकेट्स घेणारा पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता. ताहीरनं आपल्या क्रिकेट करिअरमध्ये ३०० हून अधिक टी-२० सामने खेळले आहेत. यंदाच्या आयपीएलच्या सीझनमध्ये सीएसकेनं चार सामन्यांनंतर आज ताहीरला संघात स्थान दिलं आहे. त्यामुळे ताहीरच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. 

४२ वर्षीय ताहीर तब्बल ५३ संघांकडून खेळलाय
इम्रान ताहीर आजवर तब्बल ५३ संघांकडून खेळला आहे. यात द.आफ्रिका, चेन्नई सुपरकिंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, डरहम, डर्बीशायर, ङॉल्फिन्स, गुयाना अॅमेझॉन वॉरियर्स, हँपशायर, आय़सीसी वर्ल्ड XI, लाहोर लायन्स, मुल्तान सुल्तान्स, नॉटिंघमशायर, पाकिस्तान ए, रायझिंग पुणे सुपरजाएंट्स अशा प्रमुख संघाकडून ताहीरनं प्रतिनिधीत्व केलं आहे. 

आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये आज पहिलाच सामना खेळत असलेल्या इम्रान ताहीरनं गेल्या आयपीएलमध्ये केवळ दोन सामने खेळला होता. यात एका सामन्यात ताहीरनं नाबाद १३ धावा देखील केल्या होत्या. पण एकही विकेट त्याला मिळवता आली नव्हती.

Web Title: ipl 2021 ms dhoni included imran tahir in playing 11 against rcb play for 53 teams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.