Join us  

IPL 2021: ऑस्ट्रेलियाच्या समालोचकानं IPL सोडून घेतला मालदिवचा आसरा? इतर खेळाडूही तयारीत!

IPL 2021: आयपीएलमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कोलकाता नाइट रायडर्स संघातील दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आयपीएलमधील समाविष्ट खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि समालोचकांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 4:12 PM

Open in App

IPL 2021: आयपीएलमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कोलकाता नाइट रायडर्स संघातील दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आयपीएलमधील समाविष्ट खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि समालोचकांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे. त्यात चेन्नई सुपरकिंग्ज संघाशी निगडीत सपोर्ट स्टाफमधील व्यक्तींनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि आयपीएलचे समालोचक मायकेल स्लेटर यांनी आयपीएलचं बायो-बबल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (ipl 2021 Michael Slater leaves IPL bubble escapes to Maldives other players keen to follow same route)

IPL 2021: कोरोनानं आयपीएलचं 'बायो-बबल' कसं भेदलं? कारण कळालं, सर्वच झाले हैराण!

ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मायकेल स्लेटर आता मालदिवला रवाना झाले आहेत. त्यामुळे ते आता आयपीएलच्या समालोचन पथकाचा भाग असणार नाहीत. भारतातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे ऑस्ट्रेलियन सरकारनं याआधीच भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांवर १५ मेपर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे मायकेल स्लेटर यांना मायदेशी परतता येत नाहीय. त्यात भारतातील कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या चिंतेमुळे त्यांनी भारत सोडून मालदिवला जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. 

IPL 2021: कोरोनानं IPLचं बायो-बबल भेदलं! KKR स्पर्धेतून 'आऊट' की आयपीएल स्पर्धाच रद्द?, BCCI पेचात

मायकेल स्लेटर यांनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांवरही निशाणा साधला आहे. "ऑस्ट्रेलियन सरकारला जर देशातील नागरिकांची खरंच चिंता असेल तर त्यांनी आम्हाला मायदेशी येऊ दिलं पाहिजे. तुम्ही आमच्याशी असं कसं वागू शकतो. पंतप्रधानांचे हात रक्तानं माखले आहेत. आयपीएलसोबत काम करण्यासाठी सरकारनंच मला परवानगी दिली होती. पण आता सरकार माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे", असा संताप स्लेटर यांनी व्यक्त केला आहे.

IPL 2021: नेटिझन्सनी पकडलं स्पिनर स्टार हरप्रीत ब्रार आणि पॉर्न स्टार यांच्यातील कनेक्शन, नेमकं काय आहे प्रकरण?

विशेष म्हणजे, मायकेल स्लेटर यांच्या पावलावर पाऊल ठेवून इतरही काही ऑस्ट्रेलियन खेळाडू मालदिवला रवाना होण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. आयपीएलमध्ये बायो-बबलच्या नियमांचं पालन केलं जात असतानाही कोलकाताच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, प्रशिक्षकांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे भविष्यात कोरोनाचं संकट वाढण्याची शक्यता असल्यानं परदेशी खेळाडू आणि प्रशिक्षक भारत सोडण्याचा विचार करत आहेत. 

कोलकाताच्या संघात कोरोनाचे थैमान, खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; IPLचा आजचा सामना रद्द

दरम्यान, कोलकाता नाइट रायडर्स संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स यानं मात्र कोणतीही भीती नसल्याचं वक्तव्य केलं आहे. पॅट कमिन्स याचा मॅनेजर नेल मॅक्सवेल यानं कोलकाताच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाला असला तरी पॅट सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. याशिवाय, आयपीएल व्यवस्थापनाकडून परिस्थिती अतिशय योग्य पद्धतीनं हाताळली जात असल्याचंही कमिन्सनं म्हटलं आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२१कोरोना वायरस बातम्याआॅस्ट्रेलिया