Join us  

IPL 2021, MI vs SRH T20 Live : विजय शंकरच्या दोन षटकांत सामना फिरला, SRHनं जबरदस्त कमबॅक केला; पण किरॉन पोलार्डनं इतिहास रचला

IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Update : मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा ( Rohit Sharma) व क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) यांनी मुंबई इंडियन्सला ( MI) चांगली सुरुवात करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 9:11 PM

Open in App

IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Update : मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा ( Rohit Sharma) व क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) यांनी मुंबई इंडियन्सला ( MI) चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५५ धावा जोडल्या. पण, विजय शंकरनं ( Vijay Shankar) सामन्याचे चित्र पालटले. त्यानं सलग दोन षटकांत MIच्या दोन प्रमुख खेळाडूंना माघारी पाठवले. त्यानंतर मुंबईच्या धावांचा वेग मंदावला. क्विंटन डी कॉक त्याच दबावात चूक करून माघारी परतला. ही विकेट SRHसाठी मोठी ठरली अन् MIला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.  IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Update पण, पोलार्डनं अखेरच्या दोन चेंडूंवर षटकार खेचून मोठा विक्रम केला.  रोहित शर्माचा विक्रम...पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉकनं दोन सुरेख चौकार मारून MIला सकारात्मक सुरुवात करून दिली. आयपीएल २०२१त पहिलाच सामना खेळणाऱ्या खलील अहमद गोलंदाजीवर घाई करून फटके मारण्याचा मोह रोहित-डी कॉकनं टाळला. पण, मुजीब उर रहमानच्या पहिल्याच षटकात १३ धावा कुटल्या. भुवीच्या गोलंदाजीवर रोहितनं पुल शॉट मारून आणखी एक चेंडू सीमापार पाठवत, आयपीएलमध्ये सर्वाधिक २१७  षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम नावावर केला. विजय शंकरनं त्याच्या पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सला पहिला धक्का दिला. शंकरच्या गोलंदाजीवर पुल फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित ( ३२) माघारी परतला, विराट सिंहनं त्याची कॅच घेतली. रोहितच्या खेळीत २ चौकार व २ षटकारांचा समावेश आहे.

विजय शंकरनं गेम फिरवला... सूर्यकुमार यादवनं एक चौकार व एक षटकार खेचून MIच्या धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात दिसला, परंतु विजय शंकरनं स्लोव्हर चेंडू टाकून त्याला कट अॅन बोल्ड होण्यास भाग पाडले. सूर्या १० धावांवर विजयच्या गोलंदाजीवर त्याच्याच करवी झेलबाद झाला. दोन महत्त्वाच्या विकेट्स पडल्यानंतर मुंबईची धावगती मंदावली. आदिल राशिदच्या फिरकीचा सामना करताना MIचे फलंदाज चाचपडत होते. त्याच दडपणात क्विंटनकडून चुकीचा फटका खेळला गेला अन् मुजीब उर हसनच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. क्विंटननं ५ चौकारांसह ४० धावा केल्या. १५व्या षटकात किरॉन पोलार्डला धावबाद करण्याची संधी डेव्हिड वॉर्नरकडून हुकली. राशिदनं त्याच्या ४ षटकांत २२ धावा दिल्या.IPL 2021 MI vs SRH Live T20 Score

किरॉन पोलार्ड भिडला१७व्या षटकात मुजीबच्या पहिल्याच चेंडूवर किरॉन पोलार्डनं खणखणीत षटकार खेचला. आयपीएल २०२१मधील तो सर्वात उत्तुंग ( १०५ मीटर) षटकार ठरला. पण, त्यानंतर मुजीबनं कमबॅक केलं. पाचव्या षटकावर इशान किशनला ( १२) त्यानं माघारी जाण्यास भाग पाडले. जॉनी बेअरस्टोनं लेग साईटला जाणारा चेंडू सुरेख रितीनं झेलला. १९व्या षटकात पोलार्डला जीवदान मिळाले. विजय शंकरनं सोपा झेल सोडला. पण, पुढच्या चेंडूवर हार्दिक पांड्या ७ धावांवर माघारी परतला. पोलार्डनं २२ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ३५ धावा करताना मुंबईला ५ बाद १५० धावांपर्यंत मजल मारून दिली. 

सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू

ख्रिस गेल - ३५१एबी डिव्हिलियर्स - २३७रोहित शर्मा - २१७महेंद्रसिंग धोनी - २१६किरॉन पोलार्ड - २०१विराट कोहली - २०१ 

Kieron Pollard becomes 6th batsman in the IPL after Chris Gayle, AB De Villiers, Rohit Sharma, MS Dhoni and Virat Kohli to smash 200 sixes

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सकिरॉन पोलार्डसनरायझर्स हैदराबाद