Join us  

IPL 2021, MI vs SRH T20 Live : मुंबई इंडियन्स आजच्या लढतीत ट्रम्प कार्ड खेळणार, फक्त तीन परदेशी खेळाडूंसह मैदानावर उतरणार! 

ipl 2021  t20 MI vs SRH live match score updates chennai मुंबई इंडियन्सचा संघ ( MI) आज डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादला ( SRH) धक्का देण्यासाठी सज्ज झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 4:41 PM

Open in App

IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Update : कोलकाता नाईट रायडर्स ( KKR) विरुद्ध चुरशीचा विजय मिळवल्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ ( MI) आज डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादला ( SRH) धक्का देण्यासाठी सज्ज झाला आहे. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. 

आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात सात संघांनी विजयाचे खाते उघडले आहे, पण, माजी विजेत्या सनरायझर्स हैदराबादला दोन्ही सामन्यांत हार मानावी लागली. २०१४, २०१६ व २०२०मध्येही ऑरेंज आर्मीची अशीच सुरूवात झाली होती, परंतु २०१६ व २०२०मध्ये त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात यश मिळवला होता. २०१६ मध्ये त्यांनी जेतेपदाचा चषकही उंचावला होता. केन विलियम्सची दुखापत हा SRHसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. कारण मागील सामन्यात विजयाच्या जवळ असताना केवळ मधल्या फळीत डाव सावरणारा फलंदाज नसल्यानं त्यांना हार मानावी लागली. त्यामुळे आजच्या सामन्यात केन खेळतो की नाही याची सर्वांना उत्सुकता आहे. पण, त्याचे खेळणे जवळपास अशक्य आहे. IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Updateमुंबई इंडियन्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्यांना पहिल्या सामन्यात RCBकडून हार मानावी लागली. पण, कोलकाताविरुद्ध त्यांनी गमावलेला सामना खेचून आणत त्यांना चॅम्पियन  का म्हटले जाते हे दाखवून दिले. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स जयंत यादवला संधी देऊ शकते. असे झाल्यास मुंबई मार्को जॅन्सेनला बाकावर बसून फक्त तीन परदेशी खेळाडूंसोबत मैदानावर उतरतील. या व्यतिरिक्त मुंबईच्या संघात काही बदल अपेक्षित नाही.

मुंबई इंडियन्सचे संभाव्य अंतिम ११ खेळाडू ( Mumbai Indians' likely playing XI) - रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, राहुल चहर, मार्को जॅन्सेन/जयंत यादव, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह  

सनरायझर्स हैदाराबादचे संभाव्य ११ खेळाडू ( Sunrisers Hyderabad's likely playing XI) - डेव्हिड वॉर्नर, वृद्धीमान सहा, मनीष पांडे, केन विलियम्सन, जेसन होल्डर, विजय शंकर, अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, टी नटराजन.

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबाद