Join us  

IPL 2021, MI vs RR, Live: मुंबई इंडियन्सची गाडी रुळावर, राजस्थान विरुद्ध 'रॉयल' विजय; क्विंटनचा फॉर्म परतला!

IPL 2021, MI vs RR, Live: मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या सामन्यात ७ विकेट्सनं विजय प्राप्त केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 7:11 PM

Open in App

IPL 2021, MI vs RR, Live: मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या सामन्यात ७ विकेट्सनं विजय प्राप्त केला आहे. चेन्नईच्या खेळपट्टीवर डगमगलेल्या मुंबई इंडियन्सची गाडी आजच्या सामन्यात रुळावर आल्याचा पाहायला मिळत आहे. त्यामुळे संघासाठी ही चांगली गोष्ट मानली जात आहे. मुंबई इंडियन्सकडून आज सलामीवीर क्विंटन डी कॉकनं ५० चेंडूत सर्वाधिक नाबाद ७० धावा केल्या. यात पाच चौकार आणि दोन उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. 

IPL 2021: सूर्यकुमार यादव कॉलेजमध्येच 'डान्स कोच'च्या सौंदर्यावर झाला होता 'क्लीन बोल्ड', पाहा दोघांची Love Story

राजस्थान रॉयल्सनं दिलेल्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली होती. कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी सलामीसाठी ४९ धावांची भागीदारी रचली. रोहित शर्माला राजस्थान रॉयल्सचा युवा गोलंदाज चेतन साकरिया यानं झेलबाद केलं. रोहितनं १७ चेंडूत १४ धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर सूर्यकुमार आणि क्विंटन यांनी दमदार फलंदाजी करत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. सूर्युकमारनं १० चेंडूत १६ धावा केल्या. तर अखेरच्या षटकात कृणाल पांड्यानं फटकेबाजी करत २६ चेंडूत ३९ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. कृणालनं यात दोन उत्तुंग षटकार आणि दोन चौकार ठोकले. कायरन पोलार्ड ८ चेंडूत १६ धावांवर नाबाद राहिला. (IPL 2021 MI vs RR mumbai indians won by 7 wickets against rajasthan royals in delhi)

राजस्थानकडून ख्रिस मॉरिसनं दोन विकेट्स घेतल्या तर मिस्तफिजूर रेहमनाला एक विकेट मिळाली. दरम्यान, राजस्थानकडून सलामीवीर जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी दमदार सुरुवात केली. दोघांनी सलामीसाठी ६६ धावांची भागीदारी रचली. जोस बटलरनं ३२ चेंडूत ४१ धावांची तर यशस्वी जयस्वालनं २० चेंडूत ३२ धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून राहुल चहर आणि बुमराह वगळता इतर कोणताही गोलंदाज खास कामगिरी करू शकले नाहीत. जयंत यादव याच्या तीन षटकांत राजस्थानच्या फलंदाजांनी ३३ धावा कुटल्या. तर आज संघात संधी देण्यात आलेल्या नेथन कुल्टर नाइल यालाही राजस्थानच्या फलंदाजांनी धुतलं. कुल्टर नाइलनं सामन्यात चार षटकं केली आणि एकही विकेट न घेता ३५ धावा दिल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्स