IPL 2021, MI vs RR Live Updates : मुंबई इंडियन्सच्या संघात दोन आश्चर्यकारक बदल, सलामीला उतरवणार नवी जोडी

IPL 2021, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : गतविजेत्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) आजचा सामना जिंकावाच लागणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 07:10 PM2021-10-05T19:10:31+5:302021-10-05T19:11:05+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, MI vs RR Live Updates : Mumbai win the toss and bowl first, Ishan for de Kock and Neesham for Krunal. | IPL 2021, MI vs RR Live Updates : मुंबई इंडियन्सच्या संघात दोन आश्चर्यकारक बदल, सलामीला उतरवणार नवी जोडी

IPL 2021, MI vs RR Live Updates : मुंबई इंडियन्सच्या संघात दोन आश्चर्यकारक बदल, सलामीला उतरवणार नवी जोडी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : गतविजेत्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) आजचा सामना जिंकावाच लागणार आहे. दिल्ली कॅपिटल्स ( २० गुण), चेन्नई सुपर किंग्स ( १८ गुण) व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( १६) यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. आता चौथ्या स्थानासाठी कोलकाता नाइट रायडर्स ( १२), पंजाब किंग्स ( १०), राजस्थान रॉयल्स ( १०) व मुंबई इंडियन्स ( १०) हे शर्यतीत आहेत. त्यामुळे आजचा सामना मुंबई इंडियन्स ( MI) प्रमाणे राजस्थान रॉयल्स ( RR) सह अन्य दोन संघांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मुंबई नेमकी काय रणनीती आखतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

  • रोहित शर्मा व क्विंटन डी कॉक वगळल्यास मुंबई इंडियन्सच्या एकाही फलंदाजाला या पर्वात २५०+ धावा करता आलेल्या नाहीत. अन्य फलंदाजांनी मिळून फक्त सहावेळा ५० धावांचा पल्ला ओलांडला आहे.
  • कृणाल पांड्याला ११ सामन्यांत फक्त पाच विकेट्स घेता आल्या आहेत. आयपीएलच्या कोणत्याही पर्वातील ही त्याची सर्वात खराब कामगिरी आहे. त्यानं ७.७४च्या इकॉनॉमीनं गोलंदाजी केली आहे.  
  • आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात राजस्थान रॉयल्सनं पॉवर प्लेमध्ये ८.८ धावा प्रती षटक अशा धावा केल्या आहेत आणि त्यांची सरासरी ही ४४ इतकी आहे. त्यांच्यापेक्षा जलद धावा अन्य संघाला करता आलेल्या नाहीत.

 

मुंबई इंडियन्सनं आजच्या सामन्यात दोन महत्त्वाचे व आश्चर्यकारक बदल केले आहेत. क्विंटन डी कॉकला बाकावर बसवून इशान किशनला संघात घेतले आहे, तर कृणाल पांड्याच्या जागी जिमी निशॅम खेळणार आहे

मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, जिमि निशॅम, जयंत यादव, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट ( Mumbai Indians: 1 Rohit Sharma (capt), 2 Ishan Kishan (wk), 3 Suryakumar Yadav, 4 Saurabh Tiwary, 5 Kieron Pollard, 6 Hardik Pandya, 7 Jimmy Neesham, 8 Jayant Yadav, 9 Rahul Chahar, 10 Jasprit Bumrah, 11 Trent Boult)

राजस्थान रॉयल्सनंही संघात दोन बदल केले आहेत.  श्रेयस गोपाळच्या जागी मयांक मार्कंडे, तर आकाश सिंगच्या जागी कुलदीप यादव खेळणार आहे.

राजस्थान रॉयल्स - एव्हिन लुईस, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, शिवम दुबे, ग्लेन फिलिप्स, डेव्हिड मिलर, राहुल टेवाटिया, कुलदीप यादव, मयांक मार्कंडे, मुस्ताफिजूर रहमान, चेतन सकारिया ( Rajasthan Royals: 1 Evin Lewis, 2 Yashasvi Jaiswal, 3 Sanju Samson (capt & wk), 4 Shivam Dube, 5 Glenn Phillips, 6 David Miller, 7 Rahul Tewatia, 8 Kuldip Yadav, 9 Mayank Markande, 10 Mustafizur Rahman, 11 Chetan Sakariya)

Web Title: IPL 2021, MI vs RR Live Updates : Mumbai win the toss and bowl first, Ishan for de Kock and Neesham for Krunal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.