Join us  

IPL 2021, MI vs RCB Live Updates : विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेलनं धो डाला; जसप्रीत बुमराहनं दोन चेंडूत फिरवला सामना 

IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) चा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आज भलत्याच फॉर्मात दिसला. ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून त्यानं मनसूबा स्पष्ट केला. पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 9:12 PM

Open in App

IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) चा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आज भलत्याच फॉर्मात दिसला. ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून त्यानं मनसूबा स्पष्ट केला. जसप्रीत बुमराहलाही त्यानं पूल शॉट मारून मोठा पराक्रम गाजवला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये त्यानं १०,००० धावांना गवसणी घातली अन् असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय आणि जगातला पाचवा फलंदाज ठरला. ग्लेन मॅक्सवेलचे रिव्हर्स स्विप लाजवाब होते आणि त्यात एबी डिव्हिलियर्सची अखेरच्या षटकांतील फटकेबाज म्हणजे अप्रतिम... विराट व मॅक्सवेल यांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करताना RCBला आव्हानात्मक पल्ला गाठून दिला. जसप्रीत बुमराहनं १९व्या षटकात दोन मोठे धक्के देत RCBच्या धावांना चाप लावली. 

रोहितची पत्नी रितिका समोर बसलीय, परंतु चर्चा मागे उभ्या असलेल्या सुंदरीची, कोण आहे ती?बुमराहनं दुसऱ्याच षटकात देवदत्त पडिक्कलची विकेट घेत RCBला धक्का दिला, परंतु विराटचा वेग काही कमी झाला नाही.  त्यानं बुमराहलाच टार्गेट करताना फटकेबाजी केली. मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २८ वेळा एकमेकांना भिडले आहेत, त्यात रोहितच्या संघानं १७ विजय मिळवले आहेत. ट्वेंटी-२० त सर्वाधिक धावा करणारे फलंदाज - ख्रिस गेल - १४,२७५, किरॉन पोलार्ड - ११,१९५, शोएब मलिक - १०,८०८, डेव्हिड वॉर्नर - १०,०१९ व विराट कोहली - १०,०००* असा क्रम येतो. विराट आज फूल्ल फॉर्मात होता आणि त्याला नशीबाची साथ मिळाली. ३८ धावांवर असताना हार्दिक पांड्यानं त्याचा झेल सोडला. त्यानंतर केएस भरतनं राहुल चहरला खणखणीत षटकार खेचला, परंतु चहरनं पुढच्याच चेंडूत त्याला बाद केले. भरत २४ चेंडूंत ३२ धावांवर सूर्यकुमार यादवच्या हाती झेल देऊन माघारी परतला.ग्लेन मॅक्सवेल व विराट यांची चांगली गट्टी जमली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली. ट्वेंटी-२०तील स्फोटक फलंदाज खेळपट्टीवर असूनही मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी त्यांना फार फटकेबाजी करू दिली नाही. ट्रेंट बोल्टनं १५व्या षटकात फक्त दोन धावा देत RCBवरील दडपण वाढवले आणि त्यामुळे पुढील षटकात अॅडम मिलनेच्या शॉर्ट बॉलवर विराट फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. विराटनं ४२चेंडूंत ५१ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ३ चौकार व ३ षटकारांचा समावेश होता. विराट माघारी परतल्यावर एबी डिव्हिलियर्सनं फटकेबाजी केली. मॅक्सवेलनं ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.

बुमराहनं १९व्या षटकात मॅक्सवेलचा झंझावात रोखला. त्यानं ३७ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ५६ धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर डिव्हिलियर्सलाही ( ११) त्यानं बाद करून मोठा झटका दिला. त्या षटकात बुमराहनं ६ धावा देत दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर ट्रेंट बोल्टनं अखेरचं षटक अप्रतिम फेकले. RCBला ६ बाद १६५ धावांवर समाधान मानावे लागले.   

टॅग्स :आयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीग्लेन मॅक्सवेलमुंबई इंडियन्सजसप्रित बुमराह
Open in App