Join us  

IPL 2021 , MI vs PBKS Live Updates : किरॉन पोलार्डच्या एका षटकानं पंजाब किंग्सला फेकले बॅकफूटवर; मुंबई इंडियन्ससमोर माफक लक्ष्य 

IPL 2021 , Mumbai Indians vs Punjab Kings Live Updates : हार्दिक पांड्यानं आजही गोलंदाजी न केल्यानं पुन्हा एकदा त्याच्या तंदुरूस्तीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 9:17 PM

Open in App

IPL 2021 , Mumbai Indians vs Punjab Kings Live Updates : सलग तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सनं ( MI) पंजाब किंग्सविरुद्ध मुसंडी मारलेली पाहायला मिळत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स पूर्ण जोशात खेळताना दिसला. किरॉन पोलार्डचं भन्नाट सेलिब्रेशन, कृणाल पांड्याची खिलाडूवृत्ती हे सर्व या लढतीत होतं. एडम मार्कराम व दीपक हुडानं पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतरही मुंबई इंडियन्ससमोर ते तडगे आव्हान उभं करण्यात अपयशी ठरले.

फॉर्माशी झगडणाऱ्या इशान किशनला ( ishan kishan) अखेर आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं ( MI) विश्रांती दिली. पंजाब किंग्सला ( PBKS) प्रथम फलंदाजीचे आमंत्रण देताना मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळत आहे. मनदीप सिंग ग व लोकेश राहुल यांना बॅटीशी योग्य संपर्कच होत नव्हता. सहाव्या षटकात कृणाल पांड्यानं पंजाबला पहिला धक्का दिला. मनदीप १५ धावांवर पायचीत झाला. किरॉन पोलार्ड यानं ७व्या षटकात पंजाबला दोन धक्के दिले. गेल १ व लोकेश २१ धावांवर माघारी परतला. 

कृणाल पांड्यानं टाकलेल्या ६व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ख्रिस गेलनं सरळ फटका मारला. त्यानं टोलावलेला चेंडू नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या लोकेश लाहुलच्या हाताला लागून कृणालकडे आला अन् त्यानं धावबाद केलं. मैदानावरील अम्पायर तिसऱ्या अम्पायरकडे दाद मागणात तोच कृणालनं त्यांना थांबवलं. त्याच्या या खिलाडूवृत्तीनं सर्वांचं मन जिंकलं. किरॉन पोलार्डनं एकाच षटकात ख्रिस गेल व लोकेश राहुल या दोन मोठ्या फलंदाजांना बाद करून इतिहास रचला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये त्यानं या दोन विकेटसह ३०० बळी पूर्ण केले. ट्वेंटी-२०त ३०० विकेट्स व १० हजार+ धावा असा दुहेरी पराक्रम करणारा तो जगातला पहिला खेळाडू ठरला आणि म्हणूनच त्याचं सेलिब्रेशनही भन्नाट होतं. निकोलस पूरनचा अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राहिला. जसप्रीत बुमराहनं त्याला २ धावांवर पायचीत केलं.

एडन मार्कराम व दीपक हुडा यांनी ४ बाद ४८ असा गडगडलेला पंजाबचा डाव सावरला. दोघांनी सुरुवातीला संयमी खेळ करून विकेट टिकवली अन् नंतर फटकेबाजी करून अर्धशतकी भागीदारी केली. ट्रेंट बोल्टनं टाकलेल्या १५व्या षटकात मार्करामनं १५ धावा कुटल्या. त्यामुळे अखेरच्या पाच षटकांत तुफान फटकेबाजी पाहायला मिळेल, असे वाटले होते. मात्र, रोहितनं राहुल चहरला पाचारण केलं अन् त्यानं मार्करामचा त्रिफळा उडवला. मार्करामनं २९ चेंडूंत ६ चौकारांसह ४२ धावा केल्या. हुडाही २८ धावा करून माघारी परतला. बुमराहनं २४ धावांत २ विकेट्स घेतल्या. पोलार्डनं १ षटकांत ८ धावांत २ विकेट घेतल्या. पंजाब किंग्सला ६ बाद १३५ धावाच करता आल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२१किरॉन पोलार्डमुंबई इंडियन्सपंजाब किंग्स
Open in App