Join us  

IPL 2021, MI vs KKR : किरॉन पोलार्ड पुन्हा चर्चेत आला, KKRच्या गोलंदाजाला खुन्नस देत राहिला; Video 

IPL 2021, MI vs KKR : आंतरराष्ट्रीय सामना असो किंवा फ्रँचायझी लीग, पोलार्ड त्याच्याच मस्तीच्या अंदाजात दिसतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 3:01 PM

Open in App

IPL 2021, MI vs KKR : मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) याचा अतरंगीपणा नेहमीच लक्ष वेधून घेतो. आंतरराष्ट्रीय सामना असो किंवा फ्रँचायझी लीग, पोलार्ड त्याच्याच मस्तीच्या अंदाजात दिसतो. कधी अम्पारच्या निर्णयाला विरोध म्हणून तोंडावर पट्टी बांधून क्षेत्ररक्षणाला उतरणे, ३० यार्ड सर्कलवरून नॉन स्ट्रायकर एंडला उभे राहणे, उगाच गोलंदाजाला डिवचणे, हे पोलार्डसाठी काही नवीन नाही. गुरुवारी कोलकाता नाइट रायडर्स ( KKR ) विरुद्ध मुंबई इंडियन्स ( MI) या सामन्यातही पोलार्डचा असात अतरंगीपणा पाहायला मिळाला. यावेळी त्यानं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचा आवडता गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा ( Praisdh Krishan ) याला खुन्नस दिली आणि त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

 

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात KKR ( Kolkata Knight Riders) संघानं जबरदस्त कामगिरी करताना गुणतक्त्यात टॉप फोरमध्ये प्रवेश केला आहे. गुरुवारच्या सामन्यात KKRनं मुंबई इंडियन्सचे १५९ धावांचे लक्ष्य ७ विकेट्स व २९ चेंडू राखून सहज पार केले. आता त्यांच्या खात्यात ९ सामन्यांअंती ८ गुण झाले आहेत. या सामन्यात पोलार्ड अन् प्रसिद्ध यांच्यात खुन्नसचा सामना रंगला. पोलार्डनं मारलेला चेंडू गोलंदाज प्रसिद्धच्या हातात गेला अन् त्यानं तो पोलार्डच्या दिशेनं भिरकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलार्डचा पारा चढला अन् षटक संपल्यानंतर तो प्रसिद्धकडे रागानं पाहत होता.

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरलेल्या रोहित शर्मा ( ३३) व क्विंटन डी कॉक ( ५५) यांनी मुंबई इंडियन्सला चांगली सुरुवात करून दिली. पण, मधल्या फळीनं घात केला. पोलार्डनं १५ चेंडूंत २१ धावा करताना संघाला ६ बाद १५५ धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रसिद्ध व ल्युकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात वेंकटेश अय्यर आणि राहुल त्रिफाठी यांनी अर्धशतकी खेळी केली. अय्यरनं ३० चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावा केल्या. राहुलनं ४२ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७४ धावा केल्या. KKR नं १५.१ षटकांत ३ बाद १५९ धावा करून विजय पक्का केला.

पाहा व्हिडीओ...  

टॅग्स :आयपीएल २०२१किरॉन पोलार्डकोलकाता नाईट रायडर्समुंबई इंडियन्स
Open in App