IPL 2021 : MI Vs KKR T20 Live : रोहित शर्माचा विक्रम, डेव्हिड वॉर्नरला टाकले मागे; आयपीएलच्या विक्रमात चौथे स्थान पटकावले

ipl 2021  t20 MI Vs KKR live match score updates  chennai कोलकाता नाईट रायडर्सनं त्यांच्या ताफ्यात एकही बदल केलेला नाही, तर मुंबई इंडियन्सचा सलामीवीर क्विंटन डी कॉक परतला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 07:59 PM2021-04-13T19:59:10+5:302021-04-13T19:59:42+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 MI Vs KKR Live T20 Score : Rohit Sharma becomes 4th leading run-scorer in IPL history  | IPL 2021 : MI Vs KKR T20 Live : रोहित शर्माचा विक्रम, डेव्हिड वॉर्नरला टाकले मागे; आयपीएलच्या विक्रमात चौथे स्थान पटकावले

IPL 2021 : MI Vs KKR T20 Live : रोहित शर्माचा विक्रम, डेव्हिड वॉर्नरला टाकले मागे; आयपीएलच्या विक्रमात चौथे स्थान पटकावले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021 : MI Vs KKR  T20 Live Score Update : राजस्थान रॉयल्स- पंजाब किंग्स यांच्यातील हाय स्कोरींग सामन्यानंतर आता मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्याकडून चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. Mumbai Indians नं परंपरेनुसार पहिला सामना देवाला दान केल्यानंतर आजच्या सामन्यात त्यांच्याकडून चाहत्यांना विजय हवाच आहे. दुसरीकडे Kolkata Knight Riders विजयी लय कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. KKRनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.  IPL 2021 : MI Vs KKR T20 Live Score Update

कोलकाता नाईट रायडर्सनं त्यांच्या ताफ्यात एकही बदल केलेला नाही, तर मुंबई इंडियन्सचा सलामीवीर क्विंटन डी कॉक परतला आहे आणि त्यामुळे मागच्या सामन्यात ४९ धावा करणाऱ्या ख्रिस लीनला बाकावर बसावे लागले आहे. पण, क्विंटनला ( २) फार कमाल दाखवता आली नाही. वरूण चक्रवर्थीनं दुसऱ्याच षटकात त्याला राहुल त्रिपाठीकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. पण, त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवनं ( Suryakumar Yadav) जराही दडपण न घेता आक्रमक खेळ केला. हरभजन सिंगच्या एका षटकात त्यानं तीन खणखणीत चौकार खेचले आणि संघावरील दडपण कमी केलं. KKRचा कर्णधार इयॉन मॉर्गननं पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्याच्या तीनही प्रमुख फिरकी गोलंदाजांना पाचारण केलं. IPL 2021 MI Vs KKR Live T20 Score

या सामन्यात रोहितनं १६वी धाव घेताच आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथे स्थान पटकावले. त्यानं SRHच्या डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले. 

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विराट कोहली - ५९११
सुरेश रैना  -५४२२
शिखर धवन - ५२८२
रोहित शर्मा - ५२६५*
डेव्हिड वॉर्नर - ५२५७
 

Web Title: IPL 2021 MI Vs KKR Live T20 Score : Rohit Sharma becomes 4th leading run-scorer in IPL history 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.