IPL 2021, MI vs KKR, Highlights: 'सवयी'चे परिणाम...मुंबईचा केला घात, कोलकातानं केली मात; काय घडलं अन् काय बिघडलं? जाणून घ्या...

IPL 2021, MI vs KKR, Highlights: नियमितपणे केल्या जाणाऱ्या एखाद्या कृतीला सवय म्हटले जाते. माणसाला अनेक सवयी असतात. चांगल्या सवयींचे कौतुक केले जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 12:09 AM2021-09-24T00:09:14+5:302021-09-24T00:10:10+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 MI vs KKR Highlights how kolkata knight riders makes come back to beat mumbai indians here is the full story | IPL 2021, MI vs KKR, Highlights: 'सवयी'चे परिणाम...मुंबईचा केला घात, कोलकातानं केली मात; काय घडलं अन् काय बिघडलं? जाणून घ्या...

IPL 2021, MI vs KKR, Highlights: 'सवयी'चे परिणाम...मुंबईचा केला घात, कोलकातानं केली मात; काय घडलं अन् काय बिघडलं? जाणून घ्या...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, MI vs KKR, Highlights: नियमितपणे केल्या जाणाऱ्या एखाद्या कृतीला सवय म्हटले जाते. माणसाला अनेक सवयी असतात. चांगल्या सवयींचे कौतुक केले जाते. तर वाईट सवयी टाळण्याचा सल्ला दिला जातो. आयपीएलमध्ये आजच्या सामन्यात याचेच परिणाम पाहायला मिळाले. कसे ते जाणून घेऊयात....

IPL 2021, MI vs KKR, Highlights: 

  • आयपीएल स्पर्धेत सुरुवात अतिशय संथ व निराशाजनक करायची आणि अखेरच्या टप्प्यात जबरदस्त 'कमबॅक' करायचं हिच सवय मुंबई इंडियन्सला महागात पडताना दिसत आहे. कारण आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होऊन मुंबईचे दोन सामने झाले आहेत आणि सलग दुसऱ्या सामन्यात मुंबईला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पण यावेळीच्या सीझनची परिस्थिती वेगळी आहे. यंदाचं सीझन सलग एकाच टप्प्यात झालेलं नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेला नुकतीच सुरुवात झालेली असली तरी संथ गतीनं कामगिरी करुन चालणार नाही हे स्पष्ट झालं आहे. पण संथ सुरुवातीची सवयच मुंबई इंडियन्सचा घात करतेय की काय असं चित्र निर्माण झालं आहे.
     
  • दुसरीकडे पहिल्या टप्प्यात निराशाजनक कामगिरीची नोंद केलेल्या कोलकाता नाइट रायडर्सनं मात्र आपल्या वाईट सवयीत आवश्यक ते बदल करत गृहपाठ पक्का केलेला दिसून येत आहे. कोलकातानं सलग दुसऱ्या सामन्यात दमदार सांघिक कामगिरीचा नजराणा पेश करत प्रतिस्पर्धी संघांना इशारा देऊ केला आहे.
     
  • अबूधाबीच्या मैदानात नाणेफेक जिंकून कोलकाता नाइट रायडर्सनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचं आजच्या सामन्यात संघात पुनरागमन झालं. क्विंटन डीकॉक आणि रोहित शर्मा यांनी संघाला अपेक्षित सुरुवात करुन दिली. 
     
  • मुंबईचा संघ सुरुवातीच्या १० षटकांमध्ये आक्रमक स्वरुपात खेळताना पाहायला मिळाला. पहिल्या १० षटकांमध्ये मुंबईच्या धावसंख्येनं ८० चा टप्पा ओलांडला होता. पण रोहित आणि क्विंटन डीकॉक बाद झाल्यानंतर संघाला उतरती कळा लागल्याचं पाहायला मिळालं. 

     
  • कोलकाताच्या प्रसिद्ध कृष्णा आणि लॉकी फर्ग्युसन यांनी अचूक मारा करत मुंबई इंडियन्सला जोरदार धक्के दिले. मुंबईची सुरुवात दमदार होऊनही संघाला २० षटकांच्या अखेरीस फक्त १५५ धावांपर्यंतच मजल मारता आली. क्विंटन डिकॉकच्या ५५ धावा आणि रोहितच्या ३३ धावा वगळता इतर एकही फलंदाज ३० चा आकडा गाठू शकला नाही. अखेरच्या पाच षटकांमध्ये मुंबईचा संघ गारद झाला. अखेरच्या षटकांमध्ये मुंबईच्या हार्दिक पंड्याची पुन्हा एकदा कमतरता जाणवली. 
     
  • मुंबईच्या १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकातानं पहिल्या चेंडूपासूनच आक्रमकता दाखवली. संघाचा प्रशिक्षक ब्रॅण्डन मॅक्क्युलम यानं संघ आक्रमकतेनंच खेळेल असं सुतोवाच आधीच केलं होतं. त्यानुसार युवा सलामीजोडी खेळताना दिसली. 
     
  • कोलकातानं सलामीजोडीसाठी शुबमन गिलला साथ देण्यासाठी अनेक पर्याय आजवर आजमावून पाहिले होते. पण परिस्थिती काही बदलत नव्हती. दुसऱ्या टप्प्यात मात्र संघानं एक नवं अस्त्र मैदानात उतरवलं आहे. शुबमन गिलसोबत भारतीय युवा फलंदाज व्यंकटेश अय्यर याला संधी देण्यात आली आहे. त्यानं पहिल्याच सामन्यात आपणी चुणूक दाखवून दिली होती. 
     
  • व्यंकटेश अय्यरनं आजच्या सामन्यात तर कोलकाता नाइट रायडर्सवरील मळभाचं वातावरण पूर्णपणे धुवून टाकलं. अवघ्या २५ चेंडूत अर्धशतक ठोकत कोलकाताच्या संघात नवा जोश भरण्याचं काम या युवा क्रिकेटपटूनं केलं आहे. अय्यरचे तेवर पाहून राहुल त्रिपाठीच्या फलंदाजीलाही रंग चढलेला पाहायला मिळाला. 
     
  • व्यंकटेश अय्यरनं मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. त्यानं ३० चेंडूत ५३ धावांची खेळी साकारली. तर राहुल त्रिपाठी यानं आक्रमकतेला अनुभवाची जोड देत ४२ चेंडूत नाबाद ७४ धावांची खेळी साकारुन संघाला विजय प्राप्त करुन दिला. 

     
  • प्रतिस्पर्धी संघानं निर्माण केलेल्या दबावाखाली येत चाचपडत फलंदाजी करण्याच्या वाईट सवयीवर आज कोलकातानं मात केली आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर ७ गडी आणि तब्बल २९ चेंडू राखून दणदणीत विजय प्राप्त केला. 
     
  • अशापद्धतीनं एका संघाला स्पर्धेत संथ सुरुवात करण्याच्या सवयीचे वाईट परिणाम भोगावे लागताना दिसत आहेत. तर दुसऱ्या संघानं आपल्या वाईट सवयीत बदल घडवून आणत सलग दुसऱ्या सामन्यात विजयाची नोंद केली आणि गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. 

Web Title: IPL 2021 MI vs KKR Highlights how kolkata knight riders makes come back to beat mumbai indians here is the full story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.