Join us  

IPL 2021, MI vs DC T20 Live : रोहित शर्मानं लाँग ऑफला खणखणीत षटकार खेचला, साऱ्याजणी पाहतच राहिल्या, Video 

ipl 2021 t20 MI vs DC live match score updates chennai : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) तिसऱ्याच षटकात धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 8:09 PM

Open in App

ipl 2021 t20 MI vs DC live match score updates chennai : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) तिसऱ्याच षटकात धक्का बसला. दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) कर्णधार रिषभ पंत यानं मार्कस स्टॉयनिसकडून आज गोलंदाजीची सुरूवात करून घेतली. पहिल्याच षटकात रोहितसाठी पायचीतची अपील झाली, परंतु अम्पायरनं नकार दिला. त्यानंतर आर अश्विननं टाकलेल्या दुसऱ्या षटकातही रोहितसाठी LBW अपील झाली आणि याही वेळेस अम्पायर नाबादच निर्णय दिला. IPL 2021 : MI vs DC T20 Live Score Update

खेळपट्टीवर सावरल्यानंतर रोहितनं फटकेबाजीला सुरुवात केली. पण, मार्कसनं तिसऱ्या षटकाट क्विंटनला ( १) माघारी पाठवले. यष्टिमागे रिषभनं झेल टिपला. पण, रोहित व सूर्यकुमार यादव फटकेबाजी करत होते. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी पहिल्या सहा षटकांत २३ धावांत ४६ धावांची भागीदारी केली.  MI vs DC, MI vs DC live score रोहितनं दिल्लीचा प्रमुख गोलंदाज कागिसो रबाडानं टाकलेला चेंडू लाँग ऑफवर उत्तुंग षटकात खेचला. ९५ मीटरचा हा षटकार पाहून प्रेक्षकगॅलरीत बसलेल्या क्रिकेटपटूंच्या पत्नींची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती.   IPL 2021 latest news, MI vs DC IPL Matches

पाहा व्हिडीओ...

https://www.iplt20.com/video/232595/m13-dc-vs-mi-rohit-sharma-wicket

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सर्वाधिक षटकार३८* - रोहित शर्मा३७ - ख्रिस गेल३२ - शेन वॉटसन३२ - युवराज सिंग३० - महेंद्रसिंग धोनी 

मुंबईच्या संघात एक, तर दिल्लीच्या संघात दोन बदल..इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात आज मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत तीनपैकी दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. रोहित शर्मा ( Rohit Sharma) व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या नेतृत्वाचा सामनाही पाहायला सारे उत्सुक आहेत. आजच्या सामन्यात रोहित शर्मा MIच्या अंतिम ११मध्ये बदल करण्याची शक्यता फार कमी आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना होणार आहे. MIनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ( MI won the toss and elected to bat first) मुंबई इंडियन्स ( MI's XI vs DC) - रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, राहुल चहर, जयंत यादव, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट  दिल्ली कॅपिटल्स ( DC Playing XI vs MI - शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्हन स्मिथ, रिषभ पंत, मार्कस स्टॉयनिस, ललित यादव, शिमरोन हेटमायर, आर अश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान, अमित मिश्रा --

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सरोहित शर्मादिल्ली कॅपिटल्स