IPL 2021, MI vs DC T20 Live : अमित मिश्रानं भन्नाट यॉर्कर फेकला अन् इशान किशनचा विचित्र पद्धतीनं त्रिफळा उडाला, Video 

रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड व इशान किशन या स्टार फलंदाज अमित मिश्राच्या गोलंदाजीवर झटपट माघारी परतले. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजानं मुंबई इंडियन्सविरुद्ध केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 09:37 PM2021-04-20T21:37:14+5:302021-04-20T21:37:41+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 MI vs DC Live T20 Score : Ishan Kishan of Mumbai Indians gets clean bowled by Amit Mishra yorker, Video  | IPL 2021, MI vs DC T20 Live : अमित मिश्रानं भन्नाट यॉर्कर फेकला अन् इशान किशनचा विचित्र पद्धतीनं त्रिफळा उडाला, Video 

IPL 2021, MI vs DC T20 Live : अमित मिश्रानं भन्नाट यॉर्कर फेकला अन् इशान किशनचा विचित्र पद्धतीनं त्रिफळा उडाला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ipl 2021 t20 MI vs DC live match score updates chennai : अमित मिश्राला ( Amit Mishra) आज खेळवण्याचा निर्णय दिल्ली कॅपिटल्ससाठी ( Delhi Capitals) फलदायी ठरला.  रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड व इशान किशन या स्टार फलंदाज अमित मिश्राच्या गोलंदाजीवर झटपट माघारी परतले. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजानं मुंबई इंडियन्सविरुद्ध केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. अमित मिश्रानं २४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये अमित मिश्रा आघाडीवर आहे. ( Most IPL wickets among Indians). त्याच्या नावावर १६२ विकेट्स आहेत. पीयूष चावला ( १५६), हरभजन सिंग ( १५०) व रवी अश्विन ( १३९) हे त्याच्यानंतर आहेत. अमितनं आज घेतलेल्या चार विकेट्सपैकी इशान किशनची विकेट अधिक चर्चेत ठरत आहे. IPL 2021 : MI vs DC T20 Live Score Update

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) तिसऱ्याच षटकात धक्का बसला.  मार्कस स्टॉयनिसनं तिसऱ्या षटकाट क्विंटनला ( १) माघारी पाठवले. रोहित व सूर्यकुमार यादव या दोघांनी २९ चेंडूंत ५८ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार यादव १५ चेंडूंत ४ चौकारांसह २४ धावा केल्या. रोहितचे वादळ रोखण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सनं आज अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा याला खेळवले. त्यानं दुसऱ्याच षटकात कर्णधार रोहित शर्मा व हार्दिक पांड्या यांना एकाच षटकात माघारी पाठवले. रोहितनं ३० चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४४ धावा केल्या. १ बाद ६७वरून मुंबईची अवस्था ६ बाद ८४ अशी झाली.   IPL 2021, IPL 2021 latest news, MI vs DC IPL Matches

१८व्या षटकात अमित मिश्राचे अखेरचं षटक रिषभ पंतनं टाकून घेतलं. त्यातही मिश्रानं सुरेख यॉर्कर टाकून MIचा सेट फलंदाज इशान किशनला ( २६) त्रिफळाचीत केलं. मिश्रानं २४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. इशाननं सातव्या विकेटसाठी जयंत यादवसह ३९ धावांची भागीदारी केली, परंतु यादवही ( २३) कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मुंबई इंडियन्सला २० षटकांत ९ बाद १३७ धावांवर समाधान मानावे लागले. आवेश खाननं १५ धावांत २ विकेट्स घेतल्या.  MI vs DC IPL match 2021, MI vs DC T20 Match, MI vs DC Live Score

पाहा इशान किशनची विकेट...

 

Web Title: IPL 2021 MI vs DC Live T20 Score : Ishan Kishan of Mumbai Indians gets clean bowled by Amit Mishra yorker, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.