IPL 2021, MI vs DC T20 Live : शिखर धवनचा 'मोठा' विक्रम, अमित मिश्राचाही पराक्रम; दिल्लीचा मुंबईवर विजय

ipl 2021 t20 MI vs DC live match score updates chennai : अखेरच्या षटकापर्यंत प्रतिस्पर्धी संघाला लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भाग पाडायचे अन् प्रमुख गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर विजय मिळवण्याची मुंबई इंडियन्सची रणनीती आज अपयशी ठरली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 11:25 PM2021-04-20T23:25:26+5:302021-04-20T23:32:07+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 MI vs DC Live T20 Score : Dhawan becomes the 1st player to score 5000 runs in IPL as opener, Delhi Capitals beat Mumbai Indians by 6 wickets | IPL 2021, MI vs DC T20 Live : शिखर धवनचा 'मोठा' विक्रम, अमित मिश्राचाही पराक्रम; दिल्लीचा मुंबईवर विजय

IPL 2021, MI vs DC T20 Live : शिखर धवनचा 'मोठा' विक्रम, अमित मिश्राचाही पराक्रम; दिल्लीचा मुंबईवर विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ipl 2021 t20 MI vs DC live match score updates chennai : अखेरच्या षटकापर्यंत प्रतिस्पर्धी संघाला लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भाग पाडायचे अन् प्रमुख गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर विजय मिळवण्याची मुंबई इंडियन्सची रणनीती आज अपयशी ठरली. १३७ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स विजयी खूर्चीवर बसले होते, परंतु ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह यांनी त्यांना संघर्ष करण्यास भाग पाडले. दिल्ली कॅपिटल्सनं ६ विकेट्सनं सामना जिंकला. किरॉन पोलार्डनं टाकलेला नो बॉल दिल्लीची विजयी धाव ठरली. या सामन्यात शिखर धवननं आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून ५००० धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला. IPL 2021 : MI vs DC T20 Live Score Update

पृथ्वीचा अपयशाचा पाढा...
दिल्लीच्या फिरकी गोलंदाजांनी केलेली कमाल मुंबईच्या फिरकीपटूंना करता आली नाही. दव फॅक्टरमुळे चेंडू सतत ओला होत होता आणि त्यामुळे गोलंदाजांनाही ग्रीप मिळण्यास मदत मिळत नव्हती. त्याचाही फटका मुंबईला बसला. जयंत यादवला दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉनं विकेट भेट दिली. पृथ्वी ७ धावांवर माघारी परतल्यानंतर शिखऱ धवन व स्टीव्ह स्मिथ यांनी संयमी खेळी करताना अर्धशतकी भागीदारी करून दिल्लीचा धावफलक हलता ठेवला. पण, १०व्या षटकात किरॉन पोलार्डनं मुंबईला विकेट मिळवून दिली. स्टीव्ह स्मिथ २९ चेंडूंत ४ चौकारांसह ३३ धावांवर पायचीत झाला. MI vs DC, MI vs DC live score, IPL 2021

शिखर धवन एकटा भिडला...
स्मिथ माघारी परतल्यानंतर शिखरनं सामन्याची सूत्र हाती घेतली. अखेरच्या सहा षटकांत विजयासाठी ४८ धावांची गरज असताना धवननं राहुल चहरनं टाकलेल्या १५व्या षटकात पहिल्या दोन चेंडूवर ६ व ४ रन चोपले, परंतु पाचव्या चेंडूवर धवन विकेट देऊन बसला. चहरच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात त्यानं कृणाल पांड्याला झेल दिला. धवन ४२ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ४५ धावांवर माघारी परतला. १६व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ट्रेंट बोल्टनं DCचा फलंदाज ललित यादव याला धावबाद करण्याची संधी सोडली. रिषभ पंत स्ट्राईकवर असताना त्यानं बोल्टचा चेंडूवर प्लेस केला. तोपर्यंत ललित यादव खेळपट्टीच्या मधोमध आला होता. पण, नॉन स्ट्राईक एंडला बॅक अप खेळाडू नव्हता अन् बोल्टला डायरेक्ट हीट करता आला नाही. १७व्या षटकात जसप्रीतनं DCचा कर्णधार रिषभला (७) माघारी पाठवले. MI vs DC T20 Match, MI vs DC Live Score

अखेरची तीन षटकं अन् २२ धावा
रिषभनं चुकीचा फकटा मारून पायावर धोंडा मारून घेतला.  ट्रेंट बोल्टनं टाकलेल्या १८व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ललित यादवसाठी पायचीतची अपील झाली, परंतु DRS घेऊनही MIला यश आलं नाही. बोल्टनं त्या षटकात ७ धावा दिल्या. त्यामुळे सामना १२ चेंडू १५ धाव असा चुरशीचा झाला. १९व्या षटकात जसप्रीतनं दोन नो बॉल फेकले. पण, त्यावर त्यानं दोनच धावा दिल्या. त्या षटकात १० धावा आल्यानं अखेरच्या षटकात पाच धावांची गरज होती. पोलार्डच्या पहिल्या दोन चेंडूवरच पाच धावा आल्या.  अमित मिश्रानं भन्नाट यॉर्कर फेकला अन् इशान किशनचा विचित्र पद्धतीनं त्रिफळा उडाला, Video 

अमित मिश्रानं निवड सार्थ ठरवली...
अमित मिश्राला ( Amit Mishra) आज खेळवण्याचा निर्णय दिल्ली कॅपिटल्ससाठी ( Delhi Capitals) फलदायी ठरला.  रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड व इशान किशन या स्टार फलंदाज अमित मिश्राच्या गोलंदाजीवर झटपट माघारी परतले. अमित मिश्रानं २४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजानं मुंबई इंडियन्सविरुद्ध केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये अमित मिश्रा आघाडीवर आहे. ( Most IPL wickets among Indians). त्याच्या नावावर १६२ विकेट्स आहेत. पीयूष चावला ( १५६), हरभजन सिंग ( १५०) व रवी अश्विन ( १३९) हे त्याच्यानंतर आहेत.   IPL 2021 latest news, MI vs DC IPL Matches  ( अमित) मिश्राजींनी कमाल केली, (रोहित) शर्माजींसह मुंबई इंडियन्सचे ५ फलंदाज १७ धावांत फिरले माघारी!  

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) तिसऱ्याच षटकात धक्का बसला.  मार्कस स्टॉयनिसनं तिसऱ्या षटकाट क्विंटनला ( १) माघारी पाठवले. रोहित व सूर्यकुमार यादव या दोघांनी २९ चेंडूंत ५८ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार यादव १५ चेंडूंत ४ चौकारांसह २४ धावा केल्या. रोहितनं ३० चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४४ धावा केल्या. १ बाद ६७वरून मुंबईची अवस्था ६ बाद ८४ अशी झाली. इशाननं सातव्या विकेटसाठी जयंत यादवसह ३९ धावांची भागीदारी केली, परंतु यादवही ( २३) कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मुंबई इंडियन्सला २० षटकांत ९ बाद १३७ धावांवर समाधान मानावे लागले. आवेश खाननं १५ धावांत २ विकेट्स घेतल्या. MI vs DC Live Score, IPL 2021 MI vs DC, MI vs DC Live Match
 

Web Title: IPL 2021 MI vs DC Live T20 Score : Dhawan becomes the 1st player to score 5000 runs in IPL as opener, Delhi Capitals beat Mumbai Indians by 6 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.