IPL 2021, MI vs CSK Live: दुबईत एकच आवाज...ऋतूराज...ऋतू'राज'! नाबाद ८८ धावांची खेळी साकारत मुंबईला एकटाच भिडला

IPL 2021, MI vs CSK: चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाचं मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) समोर विजयासाठी १५७ धावांचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 09:24 PM2021-09-19T21:24:41+5:302021-09-19T21:27:45+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 MI vs CSK live One voice in Dubai ... Rituraj ... Ritu 'Raj'! Mumbai were bowled out for 88 not out | IPL 2021, MI vs CSK Live: दुबईत एकच आवाज...ऋतूराज...ऋतू'राज'! नाबाद ८८ धावांची खेळी साकारत मुंबईला एकटाच भिडला

IPL 2021, MI vs CSK Live: दुबईत एकच आवाज...ऋतूराज...ऋतू'राज'! नाबाद ८८ धावांची खेळी साकारत मुंबईला एकटाच भिडला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, MI vs CSK, LIVE Updates: आयपीएलच्या १४ व्या पर्वाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज संघानं (Chennai Super Kings) गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघासमोर विजयासाठी १५७ धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजांनी आज कमाल करत दमदार सुरुवात करुन दिली होती. पावर प्लेमध्ये चेन्नईचे चार फलंदाज तंबूत दाखल झाले होते. पण मराठमोळ्या ऋतूराजनं मैदानात जम बसवत अखेरच्या षटकांत वादळी खेळी साकारत संघाला १५७ धावांपर्यंत मजल मारून दिली. ऋतूराजनं आज नाबाद ८८ धावांची आयपीएलमधील त्याची वैयक्तिक सर्वोत्तम खेळी साकारली. यात ४ खणखणीत षटकार आणि ९ नजाकती चौकारांचा समावेश होता.

नेट्समध्ये सराव केला, आज मैदानातही दिसला; तरी रोहित शर्मा संघाबाहेर का? काय आहे नेमकं कारण?  

सामन्याची नाणेफेक जिंकून चेन्नईनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ट्रेंट बोल्टनं पहिल्या षटकात फॉर्मात असलेल्या फॅफ ड्यू प्लेसिस याला माघारी धाडत खणखणीत सुरुवात करुन दिली. त्यानंतर अॅडम मिलने यानं मोइन अली याला झेलबाद करुन मुंबईला दुसरं यश मिळवून दिलं. चेन्नईच्या संघाला सुरुवातीलाच दोन धक्के बसलेले असताना अंबाती रायुडू मिलनेच्या बाऊन्सवर दुखापतग्रस्त झाला आणि पव्हेलियनमध्ये दाखल झाला. त्यामुळे चेन्नईच्या फॅफ ड्यू प्लेसिस, मोइन अली आणि रायुडू यांना खातंही उघडता आलं नाही. संघावर दबाव निर्माण न होऊ देण्यासाठी सुरेश रैना (४) मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. बोल्टनं रैनाला माघारी धाडलं. 

महेंद्रसिंग धोनीवर संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी आली. सामन्याच्या चौथ्याच षटकात धोनीवर फलंदाजीची वेळ आली. धोनीनं सावध सुरूवात केली होती. पण अॅडम मिलनेच्या गोलंदाजीवर तोही झेल देऊन बसला. बोल्डनं धोनीचा जबरदस्त झेल टिपला. चेन्नईच्या संघ पूर्णपणे बॅकफूटवर आला होता. याही परिस्थितीत ऋतूराज गायकवाड आपली विकेट सांभाळून ठेवत संयमानं खेळत होता. अखेरच्या पाच षटकांमध्ये ऋतूराजनं आक्रमक खेळीला सुरुवात करत संघाला बॅकफूटवरुन फ्रंटफूटवर आणलं. ड्वेन ब्रावोनंही चांगली साथ देत ८ चेंडूत २३ धावांची खेळी साकारली. 

Web Title: IPL 2021 MI vs CSK live One voice in Dubai ... Rituraj ... Ritu 'Raj'! Mumbai were bowled out for 88 not out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.