Join us

IPL 2021: सनरायजर्सच्या पराभवासाठी मनीष पांडे जबाबदार - सेहवाग

IPL 2021: अखेरच्या चेंडूवर त्याने षटकार मारला. पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 06:50 IST

Open in App

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये रविवारी केकेआरकडून सनरायजर्स हैदराबाद पहिल्या सामन्यात दहा धावांनी पराभूत झाला. तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करीत मनीष पांडेने नाबाद ६१ धावांचे योगदान दिले. अखेरच्या चेंडूवर त्याने षटकार मारला. पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या पराभवासाठी पांडे दोषी असल्याचे मत माजी दिग्गज वीरेंद्र सेहवाग याने व्यक्त केले. अखेरच्या सहा षटकात एकही चौकार न मारता अखेरच्याच चेंडूवर षटकार का मारला? स्थिरावलेल्या फलंदाजाची ही खराब कामगिरी नाही काय? असा प्रश्न एका चाहत्याने विचारला होता. यावर सेहवाग म्हणाला,‘खरे आहे. पांडेने अखेरच्या तीन षटकात एकही चौकार मारला? नाही. षटकार मारला, तो देखील अखेरच्या चेंडूवर. त्याने वेगवान धावा काढल्या असत्या, तर दहा धावांनी पराभवाची नामुष्की आली नसती.’‘अनेकदा असेच घडते. तुम्ही सेट झालेले असता, मात्र फटका मारण्यासारखे चेंडू मिळत नाहीत. पांडेसोबत असेच घडले. त्याच्यात आक्रमकतेची उणीव जाणवली. याचा फटका संघाला पराभवाच्या रूपाने बसला,’ असे मत सेहवागने व्यक्त केले आहे.

टॅग्स :आयपीएल २०२१विरेंद्र सेहवाग