Join us  

IPL 2021: ९वी नंतर शाळा सोडली, १४ व्या वर्षी क्रिकेट सोडलं, वेल्डिंगचं काम केलं; आता पुनरागमन करत केला धमाका!

IPL 2021: घरी आर्थिक तंगी असताना आयपीएल फ्रँचायझिंनी लावलेल्या बोलीमुळे खेळाडूंना आर्थिक आधार मिळाला. यातलंच एक नाव म्हणजे लुकमान मेरिवाला (Lukman Meriwala). 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 5:56 PM

Open in App

आयपीएलनं देशातील युवा खेळाडूंना क्रिकेटमध्ये नाव कमावण्याची संधी दिली. खेळाडूंना एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ दिलं. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या अशी अनेक नावं आहेत की ज्यांनी आयपीएलमधील कामगिरीनं आपली छाप सोडली आणि भारतीय संघात स्थान मिळवलं. देशात असे अनेक खेळाडू आहेत की ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन नाव कमावलं आहे. घरी आर्थिक तंगी असताना आयपीएल फ्रँचायझिंनी लावलेल्या बोलीमुळे खेळाडूंना आर्थिक आधार मिळाला. यातलंच एक नाव म्हणजे लुकमान मेरिवाला (Lukman Meriwala). 

महेंद्रसिंग धोनीबद्दल समालोचक आकाश चोप्राचे वादग्रस्त विधान; नेटिझन्सनी घेतला समाचार

लुकमान सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत असून तो एक वेगवान गोलंदाज आहे. आयपीएलच्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं लुकमान याला २० लाखांच्या आधारभूत किंमतीवर आपल्या संघात दाखल करुन घेतलं. लुकमान यानं पंजाब किंग्जकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. पण या खेळाडूसाठी क्रिकेटमध्ये करिअर करणं काही सोपी गोष्ट नव्हती. एकवेळ अशी आली की लुकमान याला सारंकाही सोडून वेल्डिंगचं काम करण्याची वेळ आली. घरची आर्थिक निकड पूर्ण करण्यासाठी त्यानं नोकरी स्वीकारली होती. पण आयपीएलनं त्याचं नशिब पालटलं आणि त्याला पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात आणलं.  (IPL 2021 Lukman Meriwala Inspiring Cricket Journey Delhi Capitals)

विराट कोहलीचा पारा चढला?; म्हणाला, याला कुणीतरी विमानाच्या बाहेर फेका रे! Video

३० वर्षीय लुकमान मेरिवाला यानं गेल्या काही वर्षांपासून स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक, विजय हजारे करंडक आणि रणजी करंडक स्पर्धेत त्यानं सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. जानेवारी २०२१ मध्ये सय्यद मुश्ताक अली करंडकात देखील लुकमान यानं जबरदस्त गोलंदाजी केली आणि संघाला अंतिम फेरीत नेण्यात महत्वाचं योगदान दिलं होतं. लुकमाननं या स्पर्धेत ८ सामन्यात १५ विकेट्स घेतल्या होत्या. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर होता. विजय हजारे करंडक स्पर्धेत पाच सामन्यांमध्ये त्यानं ८ विकेट्स घेतल्या. तर २०१९-२० सालच्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सात सामन्यांमध्ये तब्बल १६ विकेट्स मिळवल्या होत्या. याच सातत्यपूर्ण कामगिरीचं फळ लुकमान याला आयपीएलमध्ये मिळालं आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं त्याच्यावर विश्वास दाखवला. दिल्लीच्या संघात उमेश यादव आणि इशांत शर्मा दुखापतीमुळे बाहेर असल्यामुळे लुकमान याला खेळण्याची संधी मिळाली. 

वयाच्या १४ व्या वर्षी क्रिकेटला केला होता रामरामलुकमान मेरिवाला गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील सरनार गावातील रहिवासी आहे. याच गावातून त्यानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. अंडर-१४ संघात तो सातत्यानं खेळत राहिला. पण बडोदाच्या संघात त्याला काही जागा मिळत नव्हती. त्यात घरच्या बिकट परिस्थितीमुळे नाईलाजानं वयाच्या १४ व्या वर्षीच लुकमान मेरिवाला याला क्रिकेट सोडावं लागलं होतं. त्यानं वेल्डिंगचं काम करायला सुरुवात केली. 

धोनीचं फलंदाजीऐवजी 'या' गोष्टीकडे जास्त लक्ष; अजित आगरकर स्पष्टच बोलले!

"माझे वडील एक छोटे शेतकरी होते. त्यांची जास्त कमाई होत नव्हती. कुटुंबात पाच जण होते आणि क्रिकेटमध्येही माझं काहीच होत नव्हतं. अशावेळी कुटुंबाची मदत करण्यासाठी मी वेल्डिंगचं काम सुरू केलं. पण आई-वडिलांनी पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. माझे एक काका मला बडोदाला घेऊन गेले. तिथं मी पूर्णपणे लक्षकेंद्रीत करुन क्रिकेट खेळू लागलो आणि अखेरीस बडोदाच्या अंडर-१९ संघात माझी निवड झाली. पुढे जाऊन २०१३ साली बडोदाच्या वनडे संघातही मला संधी मिळाली", असं लुकमान मेरिवाला यानं हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

इयत्ता ९ वीपर्यंतच शिक्षण मेरिवाला याला बडोद्याच्या संघात वेगवान गोलंदाज इरफान पठाण यांचं खूप सहकार्य लाभलं. इरफान पठाणसोबत राहून त्यानं आपल्या गोलंदाजीत सुधारणा केली आणि बाऊन्सर, यॉर्करवर काम केलं. लुकमान मेरिवाला याला फक्त इयत्ता ९ वीपर्यंतच शालेय शिक्षण पूर्ण करता आलं आहे. त्याला इंग्रजी देखील येत नाही. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधार रिकी पाँटिंगनं नेमकं काय सांगतील हे आपल्याला कसं कळेल? याची चिंता लुकमान याला वाटायची. यासाठी गोलंदाज मुनाफ पटेल यानं खूप मदत केली, असंही लुकमान सांगतो. 

"होय, मी चुकलो! माझं वय झालंय आणि...", महेंद्रसिंग धोनीनं प्रांजळ मनानं दिली कबुली

यंदाच्या आयपीएलमध्ये लुकमान मेरिवाला याला पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघात खेळण्याची संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात अगदी पहिल्याच षटकात लुकमानच्या गोलंदाजीवर २० धावा कुटल्या गेल्या. त्यामुळे लुकमान दबावात आला होता. पण सहकारी खेळाडूंनी त्याला प्रोत्साहन दिलं. पुढच्या दोन षटकांत त्यानं केवळ १२ धावा दिल्या आणि एक विकेटही मिळवली.  

टॅग्स :आयपीएल २०२१दिल्ली कॅपिटल्स