Join us  

IPL 2021: कोरोनामुळे आयपीएल पुन्हा स्थगित झाली तर काय होईल? नेटिझन्सनं दिल्या भन्नाट प्रतिक्रिया...

IPL 2021: दुसऱ्या टप्प्यातील तिसऱ्या सामन्याच्या काही तास आधीच पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाल्याची बातमी येऊन धडकली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 6:22 PM

Open in App

IPL 2021: आयपीएलचं १४ वं सीझन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्यामुळे स्थगित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. पण दुसऱ्या टप्प्यातील तिसऱ्या सामन्याच्या काही तास आधीच पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाल्याची बातमी येऊन धडकली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघाचा गोलंदाज टी नटराजन याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्याच्या सहवासात आलेल्या संघातील ६ जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. यात विजय शंकर याचाही समावेश आहे. त्यामुळे आता सोशल मीडियात आयपीएल पुन्हा एकदा स्थगित केली जाण्याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. 

बिग ब्रेकिंग! IPL मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव; सनरायझर्सचा टी. नटराजन पॉझिटिव्ह

दरम्यान, आयपीएल व्यवस्थापनाकडून सामने निर्धारित वेळापत्रकानुसारच सुरू राहाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. असं असलं तरी येत्या काही दिवसात पुन्हा एकदा आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय व्यवस्थापनाला घ्यावा लागला मग  स्पर्धेचं भविष्य काय असेल याबाबत सोशल मीडियात नेटिझन्सनं विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

तुम्ही कधी जिंकता, कधी हरता; पण नेहमी शिकता!, हा केवळ फोटो नाही...प्रेरणा आहे

संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे आयपीएल देखील भारत-इंग्लंड चौथ्या कसोटी प्रमाणेच रद्द केली जाणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. मी हमी देतो की असं होणार नाही, असं खोचक ट्विट इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानं केलं आहे. याशिवाय काही नेटिझन्सनी आयपीएल पुन्हा स्थगित करावी लागली तर तिसऱ्या टप्प्यासाठी टी-२० वर्ल्डकपचा बळी जाणार का? असाही सवाल उपस्थित केला आहे. 

एका नेटिझननं तर आयपीएलचा तिसरा टप्प्या वगैरे काही होणार नाही. थेट पुढच्या वर्षी नवं सीझन पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवली आहे. तर एकानं बीसीसीआय आता आयपीएलच्या तिसऱ्या टप्प्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द करू शकतो असं म्हटलं आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२१टी नटराजनसनरायझर्स हैदराबाद
Open in App