Join us

IPL 2021, KKR vs SRH: दे घुमा के!; नितीश राणाच्या फटक्यानं कॅमेराची काच तुटली, बसला लाखोंचा फटका, Video 

IPL 2021, Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Live Updates : कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) रविवारी  सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघावर ६ विकेट्स राखून विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 16:14 IST

Open in App

IPL 2021, Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Live Updates : कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) रविवारी  सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघावर ६ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह कोलकातानं १२ गुणांची कमाई करत गुणतालिकेतील चौथे स्थान आणखी मजबूत केलं. SRHला ८ बाद ११५ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडल्यानंतर KKRनं शुबमन गिलच्या अर्धशतकाच्या जोरावर हा सामना जिंकला. KKRच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या सामन्यात KKRचा फलंदाज नितीश राणा यानं टोलावलेल्या चेंडूनं सीमारेषेवरील कॅमेराची काच फोडली अन् आयोजकांना लाखो रुपयांचा फटका बसला. 

हैदराबादला साजेशी सुरुवात करता आली नाही. पदार्पणात धुरळा उडवणारा जेसन रॉय सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. चांगल्या टचमध्ये असलेल्या वृद्धीमान सहाला आज भोपळाही फोडता आला नाही. कर्णधार केन विलियम्सननं काही सुरेख फटके मारताना हैदराबादला तारण्याचा प्रयत्न केला, परंतु अती घाई त्याला नडली. शकिबच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो ( २६) धावबाद झाला. अभिषेक शर्मा काहीतरी करेल असे वाटत होते, परंतु शाकिब अल हसनच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. हैदराबादला ८ बाद ११५ धावा करता आल्या.  

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताच्या आघाडीच्या खेळाडूंना साजेशी सुरुवात करता आली नाही. वेंकटेश अय्यर ( ८) व राहुल त्रिपाठी ( ७) यांना अनुक्रमे जेसन होल्डर व राशिद खान यांनी बाद केलं. पण, नितीश व शुबमन गिल ही जोडी टीकून खेळली. गिल ५७ धावांवर बाद झाला आणि त्यानंतर नितीश आक्रमक पवित्र्यात आला. त्यानं जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर मारलेल्या फटक्यानं कॅमेराच्या काचीचा चुराडा झाला.  पाहा व्हिडीओ...  

टॅग्स :आयपीएल २०२१कोलकाता नाईट रायडर्ससनरायझर्स हैदराबाद
Open in App