Join us

IPL 2021; KKR vs RCB: आधीच ठरलं होतं; 'ती' धुलाई मनाला लागली, ABDसाठी रसेलनं रणनीती आखली!

कोलकाता नाईट रायडर्संच्या एबी डेव्हिलीयर्सचा रसेलच्या पहिल्याच चेंडूवर त्रिफळा उडाला. एबीसाठी ही रणनिती आपण अगोदरच आखली होती, असे रसेलने सामन्यानंतर म्हटले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 14:30 IST

Open in App
ठळक मुद्देकोलकाता नाइट रायडर्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगोलरचा ९ विकेट्सनं धुव्वा उडवला. आरसीबीनं दिलेलं ९२ धावांचं आव्हान केकेआरनं १ विकेट गमावून सामन्याच्या १० व्याच षटकात गाठलं.

आयपीएलच्या १४ व्या सिझनमध्येही कमालीचा रोमांच दिसून येत आहे. अनिश्चितता असलेल्या आयपीएल क्रिकेटच्या सामन्यांमध्ये अफलातून आणि रोमहर्षक खेळ पाहायला मिळतोय. केकेआर आणि आरसीबीमधील सामन्यांतही तसंच काहीसं पाहायला मिळालं. केकेआरने आरसीबीच्या विराट संघाचा ९२ धावांत गाशा गुंडाळत एकतर्फी विजय मिळवला. त्यामध्ये, केकेआरच्या गोलंदाजांची कामगिरी दमदार ठरली. जणूकाही गोलंदाजांनी मनाची गाठ बाधूनच चेंडूफेक केली होती, असेच दिसले. विशेष म्हणजे अँड्रे रसेलने याबाबत स्पष्टपणे सांगितलंय. 

एबीने चेन्नईत एप्रिल महिन्यात झालेल्या सामन्यात केकेआरविरुद्ध 36 चेंडूत 76 धावांची तुफानी खेळी केली होती. याच सामन्याचा वचपा रसेलला काढायचा होता. या सामन्यातील एबीची फटकेबाजी आंद्रे रसेल विसरला नाही, त्यामुळेच एबीला बाद करण्यासाठी त्याने नियोजित गेम आखला. त्यातूनच, अबुधाबीतील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्संच्या एबी डेव्हिलीयर्सचा रसेलच्या पहिल्याच चेंडूवर त्रिफळा उडाला. एबीसाठी ही रणनिती आपण अगोदरच आखली होती, असे रसेलने सामन्यानंतर म्हटले. एबीने पहिल्याच चेंडूवर यॉर्करची अपेक्षाच केली नसेल, पण एबीला पहिल्याच चेंडूवर यॉर्कर टाकायचा प्लॅन आधीच ठरला होता, असे रसेलने सांगितले. श्रीकर भरत सामन्याच्या ९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर माघारी परतला. त्याच षटकात चौथ्या चेंडूवर एबी डीव्हिलियर्सला यॉर्करचा सामना करावा लागला. रसेलच्या यॉर्करवर एबी त्रिफळाचीत होऊन तंबूत परतला.  

कोलकाता नाइट रायडर्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगोलरचा ९ विकेट्सनं धुव्वा उडवला. आरसीबीनं दिलेलं ९२ धावांचं आव्हान केकेआरनं १ विकेट गमावून सामन्याच्या १० व्याच षटकात गाठलं. शुबमन गिल ४८ धावांवर बाद झाला. पण तोवर आरसीबीनं सामना हातातून गमावला होता. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या व्यंकटेश अय्यर यानं २१ चेंडूत नाबाद ४१ धावांची खेळी साकारुन विजयावर शिक्कामोर्तब केलं. दरम्यान, केकेआरकडून फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि अष्टपैलू आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर लॉकी फर्ग्युसननं दोन जणांना माघारी धाडलं. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यानं कर्णधार कोहलीची महत्त्वपूर्ण विकेट मिळवली. त्यामुळे, विराट संघाचा अवघ्या ९२ धावांतच धुव्वा उडाला होता.   

टॅग्स :एबी डिव्हिलियर्सकोलकाता नाईट रायडर्सविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App