IPL 2021, KKR vs PBKS, Highlights: पंजाबची आणखी एक रोमाचंक लढत अन् पंचांचा वादग्रस्त निर्णय; काय काय घडलं? वाचा महत्त्वाचे क्षण...

IPL 2021, KKR vs PBKS, Highlights: आयपीएलमध्ये आज दुबईत झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जनं (Punjab Kings) कोलकाताना नाइट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) ५ विकेट्सनं मात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 12:10 AM2021-10-02T00:10:13+5:302021-10-02T00:11:03+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 KKR vs PBKS Highlights KL Rahul leads Punjab Kings to 5 wicket win over Kolkata Knight Riders | IPL 2021, KKR vs PBKS, Highlights: पंजाबची आणखी एक रोमाचंक लढत अन् पंचांचा वादग्रस्त निर्णय; काय काय घडलं? वाचा महत्त्वाचे क्षण...

IPL 2021, KKR vs PBKS, Highlights: पंजाबची आणखी एक रोमाचंक लढत अन् पंचांचा वादग्रस्त निर्णय; काय काय घडलं? वाचा महत्त्वाचे क्षण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, KKR vs PBKS, Highlights: आयपीएलमध्ये आज दुबईत झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जनं (Punjab Kings) कोलकाताना नाइट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) ५ विकेट्सनं मात केली. अखेरच्या षटकापर्यंत सामना नेण्याची पंजाबला जणू सवयच झालीय अशीच काहीशी स्थिती आजच्या सामन्यातही पाहायला मिळाली. नेमकं काय काय घडलं आजच्या सामन्यात जाणून घेऊयात... 

IPL 2021, KKR vs PBKS, Highlights:

  • दुबईच्या स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या आजच्या सामन्याची नाणेफेक पंजाबनं जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. कोलकाताला सापडलेलं व्यंकटेश अय्यर नावाचं अनमोल युवा रत्न याही सामन्यात चमकलं. अय्यरनं आपल्या दमदार फॉर्म कायम राखत खणखणीत अर्धशतक ठोकलं. 
     
  • अय्यरनं आजच्या सामन्यात ४९ चेंडूत ६७ धावा कुटल्या. यात १ उत्तुंग षटकार आणि तब्बल ९ चौकारांचा समावेश होता. व्यंकटेशनं दमदार सुरुवात करुन दिल्यानंतर राहुल त्रिपाठीनं उत्तम साथ देत २६ चेंडूत ३४ धावांचं योगदान दिलं. यावेळी शुबमन गिल काही चांगली कामगिरी करू शकला नाही. तो ७ धावा करुन माघारी परतला. 
     
  • अर्शदिप सिंगनं शुबमनची विकेट घेतली. अखेरच्या षटकांमध्ये नितीश राणानं जोरदार फटकेबाजी करत २ षटकार आणि २ चौकारांच्या साथीनं १८ चेंडूत ३१ धावा ठोकल्या. तर दिनेश कार्तिकनं ११ चेंडूत ११ धावा केल्या. 
     
  • कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गन मात्र याही सामन्यात स्वस्तात माघारी परतला. मोहम्मद शमीनं मॉर्गनला (२) तंबूत धाडलं. पंजाबकडून अर्शदिप सिंगनं तीन गडी बाद केले. रवी बिश्नोईनं दोन विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमीनं एक विकेट घेतली. अखेरच्या दोन षटकांमध्ये कोलकाताच्या धावसंख्येला वेसण घातली गेली. अखेरच्या १२ चेंडूंमध्ये केवळ १४ धावा कोलकाताला करता आल्या. 
     
  • पंजाब किंग्जचा सामना म्हटलं की अखेरच्या षटकापर्यंत रंगतो आणि ऐनवेळी संघ माती करुन हातचा सामना गमावतो असं अनेकदा पाहायला मिळतं. पंजाबचा आजचा सामना देखील अखेरच्या षटकापर्यंत रंगला पण यावेळी कर्णधार केएल राहुलच्या कर्णधारी खेळीमुळं पंजाबच्या खात्यात विजयश्रीची नोंद झाली. 
     
  • पण सामन्याच्या १९ व्या षटकात केएल राहुल याचा राहुल त्रिपाठीनं टिपलेला झेल वादग्रस्त ठरला. राहुल त्रिपाठीनं टिपलेला झेल पूर्ण झालेला नसून चेंडूचा जमिनीला स्पर्श झाल्याचा निकाल तिसऱ्या पंचांनी दिला आणि केएल राहुल याला जीवनदान मिळालं होतं. तिसऱ्या पंचांनी दिलेल्या निर्णयावर समालोचन कक्षात देखील बरीच चर्चा झाली आणि केकेआरच्या ताफ्यातही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. 
     
  • कोलकातानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जकडून केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी दमदार सुरुवात करुन दिली होती. दोघांनी सलामीसाठी ७० धावांची भागीदारी रचली. मयांक अग्रवाल २७ चेंडूत ४० धावा करुन बाद झाला. केएल राहुलनं दुसऱ्या बाजूनं खिंड लढवत ठेवली. पण त्याला अपेक्षित साथ मिळत नव्हती. 
     
  • निकोलस पुरन (१२), मार्करम (१८), दिपक हुडा (३) अशा ठराविक अंतरानं विकेट्स जात राहिल्या. अखेरीस आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या शाहरुख खाननं मिळालेल्या संधीचं सोनं करत केएल राहुलला चांगली साथ दिली. शाहरुख खाननं ९ चेंडूत २ षटकार आणि एक चौकार ठोकत नाबाद २२ धावांची खेळी साकारली. 
     
  • पंजाबच्या संघानं याच मैदानात राजस्थान विरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात ४ धावांची गरज असताना सामना गमावला होता. पण त्या चुकीची पुनरावृत्ती आजच्या सामन्यात झाली नाही. हे संघाचं नशीबच मानावं लागेल कारण अखेरच्या षटकात विजयासाठी चार धावांची गरज असताना केएल राहुलनं मोठा फटका मारण्याच्या नादात विकेट गमावली आणि पुन्हा एकदा पंजाबच्या डगआऊटमध्ये चिंतेचे ढग पसरलेले पाहायला मिळाले.
     
  • पण पुढच्याच चेंडूवर शाहरुख खान यानं षटकार ठोकत पंजाबच्या विजावर शिक्कामोर्तब केलं आणि संघाला दोन गुणांची कमाई करून दिली.

Web Title: IPL 2021 KKR vs PBKS Highlights KL Rahul leads Punjab Kings to 5 wicket win over Kolkata Knight Riders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.