Join us

IPL 2021, KKR vs DC T20 Live : शुबमन गिलचा फॉर्म परतला, आंद्रे रसेलनं अखेरच्या षटकांत कहर केला! 

IPL 2021, KKR vs DC T20 Live Score : आंद्रे रसेलनं अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 21:10 IST

Open in App

IPL 2021, KKR vs DC T20 Live Score : शुबमन गिलचा फॉर्म परतल्यानं कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघात आनंदाचे वातावरण असले तरी हा आनंद ते साजरा करू शकत नाही. दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) गोलंदाजांनी त्यांच्याभवती जोरदार फास आवळला. गिल वगळता KKRच्या अन्य फलंदाजांनी DCच्या गोलंदाजांसमोर माना टाकल्या. पण, आंद्रे रसेलनं अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. 

दिल्ली कॅपिटल्सनं ( DC) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अमित मिश्राला दुखापतीमुळे आजच्या सामन्याला मुकावे लागले. त्यामुळे दिल्लीची गोलंदाजांची फळी कमकुवत होईल, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला. नितीश राणा ( १५) याला अक्षर पटेलनं चौथ्याच षटकात माघारी पाठवून कोलकाता नाईट रायडर्सला ( KKR) धक्का दिला. राहुल त्रिपाठी ( १९) याला मार्कस स्टॉयनिसनं, तर  कर्णधार इयॉन मॉर्गन ( ०) व सुनील नरीन ( ०) यांना ललित यादवनं माघारी पाठवून KKRचा निम्मा संघ ८२ धावांवर तंबूत पाठवला. शुबमन गिल आज फॉर्मात दिसला, परंतु त्याला अर्धशतकाच्या उंबरठ्यावरून माघारी फिरावे लागले. आवेश खाननं त्याची विकेट घेतली. गिलनं ३८ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ४३ धावा केल्या.

१५ षटकांत KKRनं ५ बाद ९५ धावा केल्या असताना मैदानावर आंद्रे रसेल व दिनेश कार्तिक ही सर्वात अनुभवी जोडी फटकेबाजी करताना दिसली. पण, १७व्या षटकात अक्षर पटेलच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात कार्तिक ( १४) बाद झाला. आंद्रे रसेल व पॅट कमिन्स यांनी संघर्ष करताना KKRला २० षटकांत ६  बाद १५४ धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. आंद्रे रसेल २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४५ धावांवर नाबाद राहिला. पॅट कमिन्सनं ११ धावा केल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२१कोलकाता नाईट रायडर्सदिल्ली कॅपिटल्स