Join us

IPL 2021, KKR vs DC, Live: कोलकातानं नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; आंद्रे रसेल बाहेर, दिल्लीत स्टीव्ह स्मिथचं पुनरागमन; जाणून घ्या Playing XI

IPL 2021, KKR vs DC, Live Updates: आयपीएलमध्ये आज कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात लढत होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 15:10 IST

Open in App

IPL 2021, KKR vs DC, Live Updates: आयपीएलमध्ये आज कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात लढत होत आहे. कोलकाता नाइट रायडर्सनं सामन्याची नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आंद्रे रसेल दुखापतग्रस्त झाल्यानं कोलकाताला मोठा धक्का बसला आहे. आंद्रे रसेल आजच्या सामन्यात खेळणार नाही. तर गेल्या सामन्यात महाग ठरलेल्या प्रसिद्ध कृष्णाच्या जागी आत संदीप वॉरिअरला संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे दिल्लीच्या ताफ्यात देखील एक मोठा बदल झाला आहे. पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागी संघात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ याचं संघात पुनरागमन झालं आहे. तर ललित यादव याला दिल्लीच्या संघात संधी देण्यात आली आहे.

दिल्लीच्या संघानं दमदार कामगिरीची नोंद करत प्ले-ऑफमध्ये आपली दावेदारी सिद्ध केली आहे. दिल्लीच्या संघाकडे १६ गुण जमा झाले आहेत. आजचा सामना जिंकून दिल्लीला प्ले-ऑफमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करता येईल. चतुरस्र नेतृत्वात सहज विजय नोंदविणाऱ्या दिल्लीचा इतरांनी धसका घेतला आहे. केकेआरने काही चांगले विजय नोंदविले; पण सीएसकेकडून अखेरच्या चेंडूवर झालेला पराभव त्यांना विसरावा लागेल. प्ले-ऑफमधली आपली दावेदारी कायम ठेवण्यासाठी केकेआरसाठी आजचा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे. 

कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders)इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, सुनील नरेन, लॉकी फर्ग्युसन, टीम साऊदी, संदीप वॉरिअर, वरुण चक्रवर्ती

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)ऋषभ पंत (कर्णधार, यष्टीरक्षक), स्टीव्ह स्मिथ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, शिमरन हेटमायर, अक्षर पटेल, आर.अश्विन,  आवेश खान, एन्रिक नॉर्खिया, कगिसो रबाडा, ललित यादव

टॅग्स :आयपीएल २०२१दिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App