IPL 2021: आयपीएल सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता, यूएईमध्ये १८ किंवा १९ सप्टेंबरपासून सुरुवात

IPL 2021: स्थगित झालेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) यूएईमध्ये १८ किंवा १९ सप्टेंबरपासून प्रारंभ होण्याची आशा असून, तीन आठवड्यांच्या कालावधीदरम्यान १० दिवस प्रत्येकी दोन लढतींचे आयोजन होऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 08:46 AM2021-05-26T08:46:19+5:302021-05-26T08:46:46+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: IPL likely to be held in September, starting from 18th or 19th September in UAE | IPL 2021: आयपीएल सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता, यूएईमध्ये १८ किंवा १९ सप्टेंबरपासून सुरुवात

IPL 2021: आयपीएल सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता, यूएईमध्ये १८ किंवा १९ सप्टेंबरपासून सुरुवात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : स्थगित झालेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) यूएईमध्ये १८ किंवा १९ सप्टेंबरपासून प्रारंभ होण्याची आशा असून, तीन आठवड्यांच्या कालावधीदरम्यान १० दिवस प्रत्येकी दोन लढतींचे आयोजन होऊ शकते. भारतीय क्रिकेट बोर्डच्या (बीसीसीआय) एका सीनिअर पदाधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली.

फायनलचे आयोजन ९ किंवा १० ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. लीगचे उर्वरित ३१ सामने पूर्ण करण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी पुरेसा आहे. स्पर्धेचे आयोजन बीसीसीआय, फ्रँचायझी व प्रसारण हक्क असलेल्या कंपन्यांसाठी लाभदायक ठरेल.

जैविक रूपाने सुरक्षित वातावरणात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आयपीएल ४ मेपासून स्थगित करण्यात आले होते. भारतीय संघाचा इंग्लंडविरुद्ध अखेरचा कसोटी सामना १४ सप्टेंबरला मँचेस्टरमध्ये संपेल आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण संघाला (हनुमा विहारी व अभिमन्यू ईश्वरन यांचा अपवाद वगळता) विशेष विमानाने बायोबबलमध्ये स्थानांतरित करण्यात येईल. 

सूत्रांनी सांगितले की, भारतीय संघ आणि इंग्लंडचे जे खेळाडू उपलब्ध राहतील, त्यांना एकाच चार्टर्ड विमानाने मँचेस्टरहून दुबईला पोहोचविण्यात येईल. त्याचप्रमाणे वेस्ट इंडिजचे खेळाडू कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये खेळल्यानंतर पोहोचतील. ब्रिटन व वेस्ट इंडिजवरून येणाऱ्या खेळाडूंना तीन दिवस विलगीकरणात राहावे लागेल.’ 

एका फ्रँचायझी अधिकाऱ्याने याबाबत बीसीसीआयकडून पत्र मिळाले असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची भारताची मर्यादित षटकांची मालिका रद्द करण्यात आली आहे.’ सूत्राने सांगितले की, या मालिकेचे आयोजन होणार नाही.

अधिकाऱ्याने सांगितले की, ‘बीसीसीआयने सर्व भागधारकांसोबत चर्चा केली असून, १८ ते २० सप्टेंबरदरम्यान स्पर्धा पुन्हा सुरू होऊ शकते. १८ सप्टेंबरला शनिवार आणि १९ सप्टेंबरला रविवार आहे. 
 ९ किंवा १० ऑक्टोबरला फायनल खेळली जाऊ शकते. आम्ही कार्यक्रमाला अंतिम रूप देत असून १० दिवस डबल हेडर लढती होतील. उर्वरित सात दिवस सायंकाळी सामने होतील. 
बीसीसीआय टी-२० विश्वकप स्पर्धेचा आपला यजमानपदाचा दावा सोडणार नसून, भारतात कोरोनाची स्थिती कशी राहील, याची प्रतीक्षा करील. अन्य देशांचे खेळाडू भारतात येण्यास उत्सुक राहण्याची शक्यता मात्र कमी आहे. स्वातंत्र्यानंतर भारत सध्या सर्वांत मोठ्या स्वास्थ्य संकटाला सामोरा जात आहे.

Web Title: IPL 2021: IPL likely to be held in September, starting from 18th or 19th September in UAE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.