Join us

IPL 2021: 'सुरुवात चांगली असेल तर अर्धे काम सोपे होते'

IPL 2021: मुंबईची वाटचाल पुन्हा एकदा पराभवासह झाली. हर्षल पटेलने मंद चेंडूत विविधता दाखवून उत्कृष्ट यॉर्करचा नमुना सादर केला. यामुळेच मोठे आणि आक्रमक फटके मारणारे मुंबईचे फलंदाज ढेपाळले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 05:53 IST

Open in App

- सुनील गावसकर...यांच्या लेखणीतून

चेन्नईच्या चिदम्बरम स्टेडियमवर बँगलोरने अखेरच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सचा नमविले. स्पर्धेची यापेक्षा चांगली सुरुवात कोणती असावी. मुंबईची वाटचाल पुन्हा एकदा पराभवासह झाली. हर्षल पटेलने मंद चेंडूत विविधता दाखवून उत्कृष्ट यॉर्करचा नमुना सादर केला. यामुळेच मोठे आणि आक्रमक फटके मारणारे मुंबईचे फलंदाज ढेपाळले. तरीही १६० धावांचे लक्ष्य आरसीबीसाठी सोपे नव्हते. डिव्हिलियर्सने मात्र विजयापर्यंत पोहोचविले.या सामन्यात दोन्ही संघांची कमाई काय, असा विचार केला तर पटेलने बँगलोरला शानदार विजय मिळवून दिला शिवाय जेमिसनने यशस्वी पदार्पण केले. मुंबईकडून मार्को जेन्सेन याने लक्ष वेधले. ट्रेंट बोल्टच्या सोबतीने तो आणखी उत्कृष्ट ठरेल.हैदराबाद आणि केकेआर हे एकमेकाविरुद्ध खेळून सुरुवात करणार आहेत. हैदराबादचे खेळाडू मागच्या पर्वात प्ले ऑफ खेळल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेले असावेत. संघात मोठे बदल न केल्यामुळे हा संघ संतुलित वाटतो. संघाकडे सर्वोत्कृष्ट स्पिनर राशिद खान आहे. मधल्या षटकात तो प्रतिस्पर्धी खेळाडूंना त्रस्त करू शकतो. याशिवाय सतत बळी घेत प्रतिस्पर्धी संघाला संकटात टाकू शकतो. भुवनेश्वरने फिटनेससह पुनरागमन केल्यामुळे हैदराबाद आणखी भक्कम बनला. आता त्यांच्याकडे दोन जागतिक दर्जाचे गोलंदाज असतील. नटराजन हा देखील यंदा यशस्वी होऊ शकतो. कर्णधार वॉर्नर, जॉनी बेयरेस्टॉ, केन विलियम्सन आणि मनीष पांडे यांच्यामुळे फलंदाजी फारच उत्तम ठरू शकेल.केकेआरने मागचे सत्र दिनेश कार्तिकच्या नेतृत्वावर लागलेल्या प्रश्नचिन्हासह सुरू केले. काही सामन्यांत यशस्वी कामगिरी करण्यात अपयशी ठरताच कार्तिकने स्वत:हून पद सोडले. या बदलामुळे केकेआरचे भाग्य बदलले असे मुळीच नाही. मध्येच कर्णधार बदलल्याने सहकारी खेळाडूंना ताळमेळ साधणे कठीण गेले.यंदा या संघाची फलंदाजी कशी होते, यावर बरेच काही विसंबून असेल. अनेक संघ सुनील नरेनच्या कमकुवत माऱ्याचा लाभ घेतात. अशावेळी मॉर्गन आणि आंद्रे रसेल यांना धावा वाढविण्यासाठी घाम गाळावा लागेल. गोलंदाजीत पॅट कमिन्स, लॉकी फर्ग्युसन, प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी आणि कमलेश नागरकोटी यांच्यासोबतच वरुण चक्रवर्ती यांच्या रूपाने केकेआरकडे चांगले खेळाडू आहेत. सुरुवात चांगली असेल तर अर्धे काम सोपे होते, असे मानले जाते. अशावेळी दोन्ही संघांची नजर विजयी सुरुवात करण्याकडेच असेल. (टीसीएम)

टॅग्स :आयपीएल २०२१सुनील गावसकर