Join us  

IPL 2021 : महेंद्रसिंग धोनीचा CSK संघ यंदाही प्ले ऑफसाठी पात्र ठरणार नाही; गौतम गंभीरचा दावा

IPL 2021 चेन्नई सुपर किंग्सला यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नईचा संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 4:55 PM

Open in App

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Former Indian cricketer Gautam Gambhir) यानं चेन्नई सुपर किंग्स यंदाच्या आयपीएलमध्ये ( IPL 2021) प्ले ऑफमध्येही प्रवेश करू शकणार नाही, असा अंदाज व्यक्त केला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये CSKला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागेल, असेही तो म्हणाला. आकाश चोप्रा व संजय मांजरेकर यांनीही CSK बाबत हाच अंदाज व्यक्त केला. ''मागच्या पर्वातील कामगिरीपेक्षा यंदा त्यांची कामगिरी किंचितशी सुधरेल,''असे मत आकाश चोप्रानं व्यक्त केलं. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफमध्ये प्रवेश करेल, असा दावा करणारे इयान बिशॉप हे एकमेव व्यक्ती ठरले.  खेळाडूच नव्हे, तर आयपीएलमध्ये संजना, नताशा अनुष्कासह 'या' सहा ग्लॅमरस चेहऱ्यांची हवा

चेन्नई सुपर किंग्सला यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नईचा संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरला. धोनीनं सर्वाधिक ८ वेळा आयपीएल फायनल खेळली आहे. त्यानं चेन्नई सुपर किंग्सकडून ७, तर पुणे सुपर जायंट्सकडून १ वेळा फायनल खेळली आहे. त्यानंतर सुरेश रैना ( ८) व रोहित शर्मा ( ६) असा क्रमांक येतो. चेन्नईतही मुंबई इंडियन्सचा शाही थाट; MI महालाची सफर करून तुम्ही म्हणाल क्या बात, क्या बात...!

चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) : एमएस धोनी, सुरेश रैना, केएम आसिफ, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, मिशेल सैंटनर, आर. साई किशोर, लुंगी एनगिडी, रवींद्र जडेजा, नारायण जगदीशन, ऋतुराज गायकवाड़, जोश हेजलवुड, अंबाती रायडू, दीपक चाहर, फाफ डु प्लेसिस, शार्दूल ठाकुर, ड्वेन ब्राव्हो आणि सॅम कुरेन, मोईन अली, के गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, हरि निशांत.

चेन्नई सुपर किंग्सचे वेळापत्रक१० एप्रिल, ७.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई१६ एप्रिल, ७.३० वा.पासून - पंजाब किंग्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई१९ एप्रिल, ७.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई२१ एप्रिल, ७.३० वा.पासून - कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई२५ एप्रिल, ३.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई२८ एप्रिल, ७.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली१ मे, ७.३० वा.पासून -  मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली५ मे, ७.३० वा.पासून -  राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली७ मे, ७.३० वा.पासून -  सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली९ मे, ३.३० वा.पासून -  चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स, बंगळुरू१२ मे, ७.३० वा.पासून -  चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, बंगळुरू१६ मे, ७.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू२१ मे, ७.३० वा.पासून - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता२३ मे, ७.३० वा.पासून - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता 

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सगौतम गंभीरमहेंद्रसिंग धोनी