Join us  

IPL 2021: परदेशी खेळाडूंमध्ये कोरोनाची दहशत, IPL सोडण्याचा विचार; फ्रँचायझीनं केला खुलासा

IPL 2021: आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानं स्पर्धेत समाविष्ट असलेल्या परदेशी खेळाडूंमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 11:30 AM

Open in App

IPL 2021: आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानं स्पर्धेत समाविष्ट असलेल्या परदेशी खेळाडूंमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. परदेशी खेळाडू आयपीएल सोडण्यासाठी इच्छुक असल्याचा खुलासा स्पर्धेतील एका मोठ्या फ्रँचायझीनं केला आहे. संबंधित संघ व्यवस्थापनानं याबाबत बीसीसीआयला देखील कळवलं असल्याचं समजतं. (IPL 2021: Foreign players want to quit IPL, ‘they don’t want to continue’ declares 1 of the franchise)

आयपीएलचा उद्याचा सामनाही रद्द; CSK नं खेळण्यास असमर्थता दर्शवली, खेळाडूंची दैनंदिन कोरोना चाचणी होणार

इनसाइड स्पोर्ट डॉट कॉमनं दिलेल्या माहितीनुसार आयपीएलमधी एका मोठ्या फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यानं संघातील परदेशी खेळाडू आयपीएल सोडण्यासाठी वारंवार विनंती करत असल्याचा खुलासा केला आहे. परदेशी खेळाडूंमध्ये कोरोनाबाबतची चिंता वाढली आहे. ते आता स्वत:ला असुरक्षित समजू लागले आहेत आणि बायो-बबलच्या योजनेवरही त्यांचा विश्वास राहिलेला नाही. दरम्यान, फ्रँचायझीनं परदेशी खेळाडूंना त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी घेत असल्याचं आश्वासन दिल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितंल. गरज पडल्यास भारताबाहेर जाण्यासही खेळाडूंची मदत केली जाईल असं संघ मालकांकडून खेळाडूंना सांगण्यात आलं आहे. दरम्यान परदेशी खेळाडूंनी खेळण्यास असमर्थता दाखवली तर स्पर्धा कशी खेळवली जाणार अशी चिंता देखील फ्रँचायझीनं व्यक्त केली आहे. 

IPL 2021: कोरोनामुळे IPLबाबत BCCIने घेतला मोठा निर्णय, सर्व सामने आता मुंबईत हलवणार?

समोर आलेल्या माहितीनुसार, संघातील परदेशी खेळाडूंमध्ये कोरोनाबाबत चिंता केवळ एका फ्रँचायझीपुरती मर्यादीत नाही. इतर संघांमधील परदेशी खेळाडूंमध्येही निराशेचं वातावरण निर्माण झालं आहे. "आम्ही खूप चिंतीत झालो आहोत. लक्ष्मपती बालाजी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानं देखील आम्ही चिंतीत आहोत. बीसीसीआय संपूर्ण संघाला क्वारंटाइन का करत नाहीय? परिस्थिती फार कठीण आहे आणि अशा परिस्थितीत खेळणं अतिशय कठीण आहे", असं एका परदेशी खेळाडूनं सांगितलं. 

IPL 2021: कोरोना वाढतोय, आयपीएल थांबवा; दिल्ली हायकोर्टात याचिका, BCCI समोर पेच!

दरम्यान, आयपीएलमध्ये खेळण्याचा आणि माघार घेण्याचा निर्णय खेळाडूंचा वैयक्तिक निर्णय असल्याची भूमिका इंग्लंड, द.आफ्रीका आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डानं घेतली आहे. त्यामुळे संबंधित देशांच्या क्रिकेट बोर्डानं थेट हात वर केले आहेत. यामुळेही परदेशी खेळाडूंमध्ये चिंतेचं वातावरण आहे. 

कोलकाता नाइट रायडर्स संघातील वरुण चक्रवर्थी आणि संदीप वॉरियर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एकच गहजब उडाला आहे. बायो-बबलमध्ये असूनही दोघं पॉझिटिव्ह आढळल्यानं खेळाडूंमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यात चेन्नई सुपरकिंग्ज संघाशी संबंधित सपोर्ट स्टाफमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२१कोरोना वायरस बातम्या