Join us  

IPL Final, CSK vs KKR Live Updates : निस्वार्थी Ruturaj Gaikwad; Orange Cap फॅफ ड्यू प्लेसिसकडे जाणार होती अन् महाराष्ट्राचा फलंदाज म्हणाला...

ऋतुराज व फॅफ ही जोडी यंदाच्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी सलामीवीर जोडी ठरली. त्यांनी ७५२ हून अधिक धावा केल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 10:12 PM

Open in App

IPL 2021 Final, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Updates : चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) फलंदाजांनी पुन्हा एकदा त्यांचा फॉर्म दाखवून दिला. ऋतुराज गायकवाडला मोठी खेळी साकारण्यात अपयश आलं असलं तरी त्यानं फॅफ ड्यू प्लेसिससह CSKला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर रॉबीन उथप्पा व मोईन अली यांनी दमदार फटकेबाजी करताना कोलकाता नाइट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांची धुलाई केली. मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलताना फॅफनं अखेरपर्यंत फटकेबाजी करून ८६ धावा जोडल्या. Orange Cap पटकावण्यासाठी फॅफला केवळ दोन धावा करायच्या होत्या अन् त्यानं चेंडू टोलावला, पण तो झालबाद झाला. त्यामुळे Orange Cap ही ऋतुराजकडे कायम राहिली. सामन्यानंतर जेव्हा ऋतुराजला विचारण्यात आले, तेव्हा त्याच्या उत्तरानं सर्वांची मनं जिंकली. Ruturaj Gaikwad wins IPL 2021 Orange Cap, becomes the youngest to win it.

ऋतुराज व फॅफ ही जोडी यंदाच्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी सलामीवीर जोडी ठरली. त्यांनी ७५२ हून अधिक धावा केल्या. ऋतुराजनं वैयक्तित ३२ धावा करताना फॅफसह पहिल्या विकेटसाठी ६१ धावा जोडल्या. फॅफला तिसऱ्या षटकात दिनेश कार्तिकनं ( यष्टिचीत) जीवदान दिलं. त्यानंतर रॉबीन उथप्पानं   १५ चेंडूंत ३ खणखणीत षटकारांसह ३१ धावा कुटल्या. मोईन अली अली २० चेंडूंत ३७ धावांवर नाबाद राहिला. फॅफनं ५९ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ८६ धावा केल्या आणि चेन्नईला २० षटकांत ३ बाद १९२ धावा उभारून दिल्या. कोलकाताचा ल्युकी फर्ग्युसननं ५६ धावा दिल्या. सुनील नरीननं २६ धावांत २ विकेट्स घेतल्या.

ऋतुराजनं या पर्वात ६३५ धावा करून Orange Cap नावावर केली. आयपीएल इतिहासात Orange Cap जिंकणारा तो सर्वात युवा फलंदाज ठरला. फॅफ ६३३ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. डावानंतर ऋतुराज म्हणाला,''१९०+ धावा या पुरेशा आहेत, परंतु तरीही गोलंदाजांनी चोख कामगिरी करायला हवी. फॅफनं टोलावलेला अखेरचा चेंडू षटकार जावा ही माझी इच्छा होती, त्यानं संघाच्या खात्यात सहा धावा जमा झाल्या असत्या. ( Orange Capसाठी फॅफला दोन धावा कमी पडल्या, या प्रश्नावर ऋतुराजचं उत्तर).  

टॅग्स :आयपीएल २०२१ऋतुराज गायकवाडएफ ड्यु प्लेसीसचेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App