IPL 2021 : जोस बटलर, बेन स्टोक्स नाही खेळणार, RRनं बोलावले विंडीजचे दोन आक्रमक खेळाडू! 

Indian Premier League 2021 : आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी सर्व संघांनी आपापल्या बदली खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 11:24 AM2021-09-01T11:24:13+5:302021-09-01T11:24:51+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 : Evin Lewis and Oshane Thomas to replace Jos Buttler and Ben Stokes at Rajasthan Royals | IPL 2021 : जोस बटलर, बेन स्टोक्स नाही खेळणार, RRनं बोलावले विंडीजचे दोन आक्रमक खेळाडू! 

IPL 2021 : जोस बटलर, बेन स्टोक्स नाही खेळणार, RRनं बोलावले विंडीजचे दोन आक्रमक खेळाडू! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League 2021 : आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी सर्व संघांनी आपापल्या बदली खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. राजस्थान रॉयल्सनेही मंगळवारी जोस बटलरबेन स्टोक्स यांच्याजागी बदली खेळाडूंची नावं जाहीर केली. इंग्लंडचे खेळाडू जोस बटलरबेन स्टोक्स हे यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार नाहीत. राजस्थान रॉयल्सनं वेस्ट इंडिजचा सलामीवीर एव्हीन लुईस आणि जलदगती गोलंदाज ओशाने थॉमस यांना करारबद्ध केले आहे. ( The Rajasthan Royals have signed West Indies opening batter Evin Lewis and fast bowler Oshane Thomas as replacements for Jos Buttler and Ben Stokes, for the second leg of IPL 2021) 

वीरेंद्र सेहवगानं KBC 13 मध्ये ग्रेग चॅपल यांच्यावरून सौरव गांगुलीची घेतली फिरकी, Video Viral

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विंडीज फलंदाजांमध्ये लुईस पाचव्या क्रमांकावर आहे. लुईसनं १०३ षटकारांसह १३१८ धावा केल्या आहेत. षटकारांच्या बाबतीत ख्रिस गेल ( १२१) हा एकमेव फलंदाज लुईसच्या पुढे आहे. लुईस सध्या कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स संघाचे प्रतिनिधित्व करताना ६ , ६२ आणि ३० अशा धावा केल्या आहेत. रॉयल्सकडून प्रथमच तो खेळणार आहे. याआधी आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सकडून २०१८ व २०१९मध्ये खेळला आहे. 

CPL 2021 : किरॉन पोलार्डचा ट्वेंटी-२०त मोठा विक्रम, पण चर्चा होतेय ती त्याच्या विचित्र निषेधाची, पाहा Video

ओशाने थॉमस पुन्हा राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात परताल आहे. २०१९च्या पर्वात तो RRकडून चार सामने खेळला होता व ५ विकेट्स घेतल्या होत्या. CPL मधील बार्बाडोस रॉयल्स संघातील थॉमस हा दुसरा खेळाडू आहे की जो RRकडून खेळणार आहे. यापूर्वी जोफ्रा आर्चर याला रिप्लेसमेंट  म्हणून न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्स याला RRनं करारबद्ध केले होते. थॉमस यानं CPLमध्ये गेलला १४२Kphच्या वेगानं चेंडू फेकला होता.   

राजस्थान रॉयल्सचे वेळापत्रक

  • 21 सप्टेंबर - पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
  • 25 सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून
  • 27 सप्टेंबर- सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
  • 29 सप्टेंबर - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू, सायं. 7.30 वाजल्यापासून
  • 2 ऑक्टोबर - राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
  • 5 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
  • 7 ऑक्टोबर - कोलकाता नाइट रायडर्स वि राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून

 

Web Title: IPL 2021 : Evin Lewis and Oshane Thomas to replace Jos Buttler and Ben Stokes at Rajasthan Royals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.