Join us  

IPL 2021, Sam Curran : सॅम कुरनच्या जागी चेन्नई सुपर किंग्सनं खतरनाक खेळाडू घेतला, ड्वेन ब्राव्होच्या संघाला जिंकून दिलंय CPL 2021 टायटल!

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या अखेरची काही सामने शिल्लक असताना चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) तगडा खेळाडू ताफ्यात दाखल करून घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 10:30 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या अखेरची काही सामने शिल्लक असताना चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) तगडा खेळाडू ताफ्यात दाखल करून घेतला. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन ( Sam Curran) यानं पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांतून माघार घेतली. त्यानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतूनही माघार घेतली. सॅम कुरनला बदली म्हणून CSKनं ड्वेन ब्राव्होच्या खास माणून CSKनं ताफ्यात दाखल करून घेतला. कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या ( CPL 2021) अंतिम सामन्यात त्याच्या स्फोटक खेळीनं कर्णधार ब्राव्होनं जेतेपद जिंकलं होतं आणि आता हा खेळाडू CSKसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

सॅम कुरनसाठी आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा काही खास जाताना दिसला नाही. त्यामुळेच धोनीनं त्याला रोटेशन पद्धतीनं खेळवलं. पण, आता दुखापतीमुळे त्याला स्पर्धा सोडावी लागली. त्याला या पर्वात ९ सामन्यांत ५६ धावा करता आल्या तर ९ विकेट्स घेतल्या. चेन्नईचा साखळी फेरीतील अखेरचा सामना उद्या पंजाब किंग्सविरुद्ध होणार आहे आणि हा नवा खेळाडू कदाचित पदार्पण करू शकतो.  डॉमिनिक ड्रॅक्स ( Dominic Drakes) याची चेन्नईनं निवड केली आहे. CPL 2021च्या फायनलमध्ये त्यानं २४ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार खेचून नाबाद ४८ धावा करताना सेंट किट्स व नेव्हीस पॅट्रीओट्स संघाला जेतेपद पटकावून दिलं. ब्राव्होच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या  संघानं सेंट ल्युसिया किंग्सचे १६० धावांचे लक्ष्य अखेरच्या चेंडूवर पार करून ३ विकेट्स राखून विजय मिळवला होता.  

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सकॅरेबियन प्रीमिअर लीगड्वेन ब्राव्हो
Open in App