Join us

IPL 2021, Deepak Chahar proposed girlfriend : खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो; दीपक चहरनं सर्वांसमोर केलं प्रपोज अन्... 

चेन्नई सुपर किंग्सनं सामना गमावला पण दीपक चहरनं मन जिंकलं. त्यानं सामन्यानंतर गर्लफ्रेंडला थेट लग्नाची मागणी घातली..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 19:11 IST

Open in App

IPL 2021, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Updates : लोकेश राहुलच्या नाबाद ९८ धावांनी पंजाब किंग्सला मोठा विजय मिळवून दिला. चेन्नई सुपर किंग्सनं हा सामना गमवला असता तरी गुणतालिकेतील त्यांचे दुसरे स्थान कायम आहे. पण, या सामन्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर प्रेमाची मॅच झाली अन् त्यात CSKचा गोलंदाज दीपक चहरनं बाजी मारली. सामन्यानंतर दीपकनं त्याच्या गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी घातली. 

ऋतुराज गायकवाड ( १२), मोईन अली ( ०), सुरेश रैना ( २) व अंबाती रायुडू ( ४) हे झटपट माघारी परतले. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आजतरी खेळेल असे वाटले होते, परंतु रवी बिश्नोईनं ( Ravi Bishnoi) त्याला पुन्हा त्रिफळाचीत केले. फॅफ ड्यू प्लेसिसनं ४६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. फॅफनं ५५ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ७६ धावा केल्या. चेन्नईनं ६ बाद १३४ धावा केल्या.

लोकेश राहुल व मयांक अग्रवाल यांनी आक्रमक सुरुवात केली. दोघांनी ४.३ षटकांत ४६ धावा जोडल्या.  खणखणती षटकात व सुरेख पदलालित्य वापरून त्यानं मारलेले चौकार, CSKच्या चेहऱ्यावर निराशा पसरवत होते. पंजाबनं १३ षटकांत ४ बाद १३९ धावा करताना सामना जिंकला.  लोकेश ४२ चेंडूंत ७ चौकार व ८ षटकारांसह ९८ धावांवर नाबाद राहिला.   

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सपंजाब किंग्स
Open in App