Join us

IPL 2021 : DC Vs SRH T20 Live : पृथ्वी शॉची बॅट तळपली, पण रिषभ पंतच्या चुकीनं DCच्या धावांचा ओघ आटला

ipl 2021  t20 DC Vs SRH live match score updates Chennai : पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी ज्या गतीनं दिल्ली कॅपिटल्सला सुरुवात करून दिली, तो वेग कायम राखण्यात अन्य फलंदाज अपयशी ठरले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 21:14 IST

Open in App

ipl 2021  t20 DC Vs SRH live match score updates Chennai : पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी ज्या गतीनं दिल्ली कॅपिटल्सला सुरुवात करून दिली, तो वेग कायम राखण्यात अन्य फलंदाज अपयशी ठरले. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात DCला २० षटकांत ४ बाद १५९ धावा करता आल्या. रिषभ पंत व पृथ्वी यांच्यातला ताळमेळ चुकला नसता तर फॉर्मात असलेला पृथ्वी बाद झाला नसता अन् DCचा धावांचा ओघ आटला.  IPL 2021 : DC Vs SRH T20 Live Score Update

दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी ८१ धावा जोडताना सनरायझर्स हैदराबादच्या ( Sunrisers Hyderabad) गोलंदाजांची धुलाई केली. राशिद खाननं SRHला पहिलं यश मिळवून दिलं अन् धवन २६ चेंडूंत ३ चौकारांसह २८ धावांवर माघारी परतला. पृथ्वी आज तुफान फॉर्मात दिसत होता, परंतु कर्णधार रिषभ पंत व त्याच्यातील ताळमेळ चुकला. पृथ्वीला ३९ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५३ धावांवर धावबाद होऊन माघारी परतावले लागले. ८४ धावांवर DCचे दोनही सलामीवर बाद झाले. DC Vs SRH, DC Vs SRH live score, IPL 2021

रिषभ पंत व स्टीव्ह स्मिथ यांनी संयमी खेळ करताना दिल्ली कॅपिटल्सचा धावफलक हलता ठेवला. त्यांना नशीबाची साथही मिळाली. SRHच्या क्षेत्ररक्षकांनी त्यांचे सोपे झेल टाकले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. सिद्धार्थ कौलनं टाकलेल्या १९व्या षटकात जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात रिषभ झेलबाद झाला. रिषभनं २७ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३७ धावा केल्या. त्याच षटकात निकोलस पूरन ( १) माघारी परतला. स्मिथ खेळपट्टीवर होता, परंतु त्याची बॅट आज त्याला साथ देत नव्हती. त्याच्या भात्यातून मोठे फटकेच येत नव्हते. तुक्का लागावा तसे त्याला चौकार मिळत होते. तो २६ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३४ धावांवर नाबाद राहिला. DC Vs SRH IPL Matches, DC Vs SRH IPL match 2021

टॅग्स :आयपीएल २०२१दिल्ली कॅपिटल्ससनरायझर्स हैदराबादपृथ्वी शॉ