IPL 2021, Prize Money won by CSK : चेन्नई सुपर किंग्सनं जेतेपदासह जिंकले कोट्यवधी रुपये; जाणून घ्या कोणाला मिळाली किती बक्षीस रक्कम

IPL 2021 Final, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Updates : चेन्नई सुपर किंग्स ( CSK)नं चौथ्यांदा आयपीएल जेतेपद जिंकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 01:13 AM2021-10-16T01:13:31+5:302021-10-16T01:14:17+5:30

IPL 2021, CSK Won 4th Title : Prize Money won by CSK and the award winners of the tournament, see full list  | IPL 2021, Prize Money won by CSK : चेन्नई सुपर किंग्सनं जेतेपदासह जिंकले कोट्यवधी रुपये; जाणून घ्या कोणाला मिळाली किती बक्षीस रक्कम

IPL 2021, Prize Money won by CSK : चेन्नई सुपर किंग्सनं जेतेपदासह जिंकले कोट्यवधी रुपये; जाणून घ्या कोणाला मिळाली किती बक्षीस रक्कम

Next

IPL 2021 Final, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Updates : चेन्नई सुपर किंग्स ( CSK)नं चौथ्यांदा आयपीएल जेतेपद जिंकले. मुंबई इंडियन्सनंतर ( ५) सर्वाधिक जेतपदाच्या विक्रमात CSKनं एक पाऊल आणखी पुढे टाकले. CSKच्या १९२ धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) सुरुवात दणक्यात केली, परंतु ११व्या षटकात शार्दूल ठाकूरनं सामना फिरवला. बिनबाद ९१ वरून कोलकाताचे ९ फलंदाज ७४ धावांत माघारी परतले. या जेतेपदासह चेन्नई सुपर किंग्सवर कोट्यवधींच्या बक्षीस रकमेची उधळण झाली. IPL 2021: Prize Money won by the award winners of the tournament


ऋतुराज गायकवाड  व फॅफ ड्यू प्लेसिस ही जोडी यंदाच्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी सलामीवीर जोडी ठरली. त्यांनी ७५२ हून अधिक धावा केल्या. ऋतुराज ( ३२), रॉबीन उथप्पा (१५ चेंडूंत ३ षटकारांसह ३१ धावा), मोईन अली (३७) आणि . फॅफनं ( ५९ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ८६ धावा) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईनं ३ बाद १९२ धावा केल्या. कोलकाताचा ल्युकी फर्ग्युसननं ५६ धावा दिल्या. सुनील नरीननं २६ धावांत २ विकेट्स घेतल्या. CSK won IPL 2021 Final

प्रत्युत्तरात शुबमन गिल ( ५१) व वेंकटेश अय्यर ( ५०) यांनी ९१ धावांची सलामी दिली. ११व्या षटकात KKRच्या डावाला कलाटणी मिळाली. शार्दूल ठाकूरनं ११व्या षटकात वेंकटेश ( ५०)  व नितीश राणा ( ०) यांना माघारी पाठवले. त्यानंतर कोलकातानं विकेट्सची रांग लावली. सुनील नरीन ( २), गिल (५१), इयॉन मॉर्गन ( ४), दिनेश कार्तिक (९), शाकिब अल हसन (०), राहुल त्रिपाठी ( २) हे अपयशी ठरले. दीपक चहरनं ३१ धावांत १, रवींद्र जडेजानं ३७ चेंडूंत २ विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूडनंही दोन, तर शार्दूरनं ३८ धावांत ३ विकेट्स घेतल्या.


जाणून घेऊया कोणाला किती मिळाले बक्षीस....

Emerging Player Awardऋतुराज गायकवाड - १० लाख
IPL 2020 Fair Play Awardराजस्थान रॉयल्स - १० लाख
Game Changer of the Seasonहर्षल पटेल - १० लाख
Super Striker of the Seasonशिमरोन हेटमायर - १० लाख
सर्वाधिक षटकार    लोकेश राहुल - १० लाख
Power Player of the Season    वेंकटेश अय्यर - १० लाख
Purple Cap    हर्षल पटेल  - १० लाख
Orange Capऋतुराज गायकवाड    - १० लाख
Most Valuable Playerहर्षल पटेल - १० लाख
विजेता    चेन्नई सुपर किंग्स - २० कोटी
उपविजेताकोलकाता नाइट रायडर्स- १२.५ कोटी
तिसरा क्रमांकदिल्ली कॅपिटल्स - ८.७५ कोटी
चौथा क्रमांकरॉयल चॅलेंजर्स बंगलोर - ८.७५ कोटी
  

 

Web Title: IPL 2021, CSK Won 4th Title : Prize Money won by CSK and the award winners of the tournament, see full list 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app