Join us  

IPL 2021, CSK Vs SRH T20 Live : हैदराबादनं नाणेफेक जिंकली, पण महेंद्रसिंग धोनीला हवा तोच निर्णय घेतला!

पहिली लढत गमावल्यानंतर समतोल साधत शानदार कामगिरी करणारा चेन्नई सुपरकिंग्स संघ ( Chennai Super Kings) IPL 2021मध्ये आज सनरायजर्स हैदराबादविरुद्ध ( Sunrisers Hyderabad) प्रबळ दावेदार म्हणून सुरुवात करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 7:04 PM

Open in App

ipl 2021  t20 CSK Vs SRH live match score updates Delhi :  पहिली लढत गमावल्यानंतर समतोल साधत शानदार कामगिरी करणारा चेन्नई सुपरकिंग्स संघ ( Chennai Super Kings) IPL 2021मध्ये आज सनरायजर्स हैदराबादविरुद्ध ( Sunrisers Hyderabad) प्रबळ दावेदार म्हणून सुरुवात करणार आहे. सनरायझर्स हैदराबादनं ( SRH) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला प्रथम गोलंदाजीच करायची होती आणि डेव्हिड वॉर्नरनं त्याच्या मनासारखाच निर्णय घेतला. IPL 2021 : CSK Vs SRH T20 Live Score Update

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने पहिली लढत गमावल्यानंतर शानदार पुनरागमन केले. तीन वेळच्या चॅम्पियन चेन्नई संघासाठी २०२०चे पर्व चांगले गेले नव्हते; पण यावेळी संघातील अनुभवी खेळाडू त्यांच्यासोबत असून, ते आपली छाप पाडत आहेत. अष्टपैलू रवींद्र जडेजाने सीएसकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने आपल्या डावखुऱ्या फिरकीने बळीही घेतले आणि क्षेत्ररक्षणातही छाप सोडली. सलामीवीर फलंदाज रुतुराज गायकवाड व फाफ ड्यूप्लेसिस चांगल्या फॉर्मात आहेत, तर सुरेश रैना व अंबाती रायुडू यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.CSK Vs SRH, CSK Vs SRH live score, IPL 2021

  • हैदराबादच्या ताफ्यात दोन बदल - मनीष पांडे व संदीप शर्मा यांचा समावेश 
  • चेन्नईच्या संघात लुंगी एनगिडी व मोईन अली यांचे पुनरागमन  

चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings Playing XI) - ऋतुराज गायकवाड, फॅफ ड्यू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, शार्दूल ठाकूर, लुंगी एनगिडी, दीपक चहर ( Ruturaj Gaikwad, Faf du Plessis, Moeen Ali, Suresh Raina, Ambati Rayudu, MS Dhoni(w/c), Ravindra Jadeja, Sam Curran, Shardul Thakur, Lungi Ngidi, Deepak Chahar)

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad Playing XI) - डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, केदार जाधव, विजय शंकर, राशिद खान, जगदीशा सुचिथ, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल ( David Warner(c), Jonny Bairstow(w), Kane Williamson, Manish Pandey, Kedar Jadhav, Vijay Shankar, Rashid Khan, Jagadeesha Suchith, Sandeep Sharma, Khaleel Ahmed, Siddarth Kaul )  

टॅग्स :आयपीएल २०२१सनरायझर्स हैदराबादचेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीडेव्हिड वॉर्नर