Join us

IPL 2021, CSK vs RR  Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिसनं RRच्या गोलंदाजावर बॅट उगारली की आणखी काही?; Video नं उडवलाय गोंधळ

IPL 2021, CSK vs RR Live Updates : चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) ऐटित प्ले ऑफमध्ये स्थान पक्क केलं आणि आज त्यांच्यासमोर राजस्थान रॉयल्सचे ( RR) आव्हान आहे. CSKसाठी हा सामना तितका महत्त्वाचा नसला तरी गुणतालिकेत टॉप टूमध्ये राहण्याचा त्यांचा प्रयत्न असेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 21:09 IST

Open in App

IPL 2021, Rajasthan Royals vs Chennai Super Kings Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड यांनी पुन्हा एकदा CSKला चांगली सुरुवात करून दिली. फॅफनं काही अप्रतिम फटके मारले, परंतु मुश्ताफिजूर रहमान आणि त्याच्यात जबरदस्त टक्कर झाली. फॅफ धाव घेण्याच्या प्रयत्नात रहमानच्या अंगावर जोरात आदळला अन् त्याची मान दुखावली गेली. त्यानंतर राहुल टेवाटियाच्या गोलंदाजीवर फॅफ ( २५) बाद झाला. सुरेश रैनाला आज बढती मिळाली, परंतु त्यालाही ( ३) टेवाटियानं बाद केलं. ऋतुराजनं सातत्य राखताना आयपीएल २०२१मधील चौथे अर्धशतक पूर्ण केले. आयपीएल २०२१तील मागील ९ डावांपैकी ऋतुराजनं सलग ८व्यांदा ३०+ धावा केल्या.

अर्धशतकानंतर ऋतुराजनं धावांचा वेग वाढवताना टेवाटियाला सलग दोन खणखणीत षटकार खेचले. पण, त्याच षटकात मोईन अलीला आणखी धावा चोपण्याची हाव महागात पडली. अली २१ धावांवर यष्टिचीत झाला. 

पाहा व्हिडीओ...

चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) ऐटित प्ले ऑफमध्ये स्थान पक्क केलं आणि आज त्यांच्यासमोर राजस्थान रॉयल्सचे ( RR) आव्हान आहे. CSKसाठी हा सामना तितका महत्त्वाचा नसला तरी गुणतालिकेत टॉप टूमध्ये राहण्याचा त्यांचा प्रयत्न असेल आणि त्यामुळे ते याही सामन्यात दमदार कामगिरी करतील. राजस्थानसाठी ही मॅच डू ऑर डाय अशी आहे. उभय संघांमध्ये २४ सामने झालेत आणि चेन्नईनं त्यापैकी १५ मध्ये विजय मिळवला आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. RRनं संघात पाच बदल केले, तर CSK नं दोन. 

टॅग्स :आयपीएल २०२१एफ ड्यु प्लेसीसचेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्स
Open in App