Join us  

IPL 2021, Ravindra Jadeja : सर रवींद्र जडेजा खूश झाले, थोपटली अम्पायर अनिल चौधरी यांची पाठ; जाणून घ्या नेमकं घडलं काय

IPL 2021, CSK vs RCB Ravindra Jadeja : CSKचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यानं चक्क अम्पायर अनिल चौधरी ( Anil Chaudhary) यांच्या पाठीवर थाप मारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 2:31 PM

Open in App

IPL 2021, CSK vs RCB Ravindra Jadeja : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) ६ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयानंतर CSKनं गुणतक्त्यात अव्वल स्थानावर झेप घेतली. या सामन्यानंतर कर्णधार कोहलीनं गोलंदाजांचे कान टोचले, परंतु या सामन्यात असा एक प्रसंग घडला की ज्याची चर्चा आता होत आहे. CSKचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यानं चक्क अम्पायर अनिल चौधरी ( Anil Chaudhary) यांच्या पाठीवर थाप मारली.

महेंद्रसिंग धोनीच्या शिलेदारांनी १० षटकांत बाजी उलटवली, विराट कोहलीच्या RCBची जिरवली!

विराट कोहलीच्या खिलाडूवृत्तीवर ऋतुराज गायकवाडनं उपस्थित केली शंका?, चढला कॅप्टनचा पारा, Video

RCBच्या फलंदाजी सुरू असताना ११व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हा मजेशीर प्रसंग घडला. जडेजाच्या गोलंदाजीवर देवदत्त पडिक्कल स्ट्राईकवर होता. जडेजानं ऑफ स्टम्पबाहेर चेंडू टाकला आणि त्यानंतर पडिक्कल अम्पायरच्या निर्णयाकडे पाहत होता. पण, अनिल चौधरीनं Wide बॉल दिला नाही. या निर्णयानंतर जडेजाही पडिक्कलकडे पाहून योग्य निर्णय आहे, असं डोकं हलवलं आणि पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी जाताना अम्पायरच्या पाठीवर हात मारला. सध्या हा व्हिडीओ चांगला व्हायरल होत आहे. 

पाहा व्हिडीओ..  रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाला आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) ६ विकेट्स राखून विराट कोहलीच्या संघाला पराभूत करून गुणतक्त्यात पुन्हा अव्वल स्थान काबीज केले. चेन्नईनं १५७ धावांचे लक्ष्य १८.१ षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. 

विराट कोहली ( ५३) व देवदत्त पडिक्कल ( ७०) यांनी RCBला चांगली सुरुवात करून देताना पहिल्या विकेटसाठी १११ धावा जोडल्या. पण, त्यानंतर त्यांची गाडी घसरली. CSKच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करताना अखेरच्या १० षटकांत RCBला ६६ धावांत ६ धक्के दिले. ड्वेन ब्राव्होनं ३, शार्दूल ठाकूरनं २ आणि दीपक चहरनं १ विकेट घेतली. प्रत्युत्तरात ऋतुराज गायकवाड ( ३८), फॅफ ड्यू प्लेसिस ( ३१) , अंबाती रायुडू ( ३२), मोईन अली ( २३) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. सुरेश रैना ( १७) व धोनी ( ११) हे नाबाद राहिले.

टॅग्स :आयपीएल २०२१रवींद्र जडेजाचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App