IPL 2021, CSK vs RCB Live : विराट कोहलीनं घेतला अफलातून झेल, चेन्नई सुपर किंग्सला दिला धक्का,Video 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 10:37 PM2021-09-24T22:37:34+5:302021-09-24T22:38:25+5:30

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या ( RCB) १५६ धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ससाठी ( CSK) सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली

IPL 2021, CSK vs RCB Live Updates: What a catch from Virat Kohli to end a good partnership between Ruturaj Gaikwad and Faf Du Plessis, Video | IPL 2021, CSK vs RCB Live : विराट कोहलीनं घेतला अफलातून झेल, चेन्नई सुपर किंग्सला दिला धक्का,Video 

IPL 2021, CSK vs RCB Live : विराट कोहलीनं घेतला अफलातून झेल, चेन्नई सुपर किंग्सला दिला धक्का,Video 

Next

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या ( RCB) १५६ धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ससाठी ( CSK) सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली. ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावा जोडल्या, परंतु याच धावसंख्येवर दोन्ही सलामीवीर माघारी परतले. युझवेंद्र चहलनं CSKला पहिला धक्का दिला आणि पुढील षटकात ग्लेन मॅक्सवेलनं दुसऱ्या सलामीवीरालाही बाद केले. यावेळी ऋतुराजनं RCBचा कर्णधार विराट कोहलीच्या ( Virat Kohli) खिलाडूवृत्तीवर शंका उपस्थित केली. विराटनं अफलातून झेल टिपला तरीही ऋतुराज खेळपट्टीवरच उभा राहिला अन् त्यामुळे विराटचाही पारा चढला. 

वाट लागली; RCBच्या सुसाट वेगानं पळणाऱ्या गाडीला लागला ब्रेक, ४५ धावांत गमावले ६ फलंदाज

फक्त चांगली सुरुवात करून दिली म्हणजे मोठी धावसंख्या उभारली असं होतं नाही. त्यासाठी मधल्या फळीतील फलंदाजांचेही योगदान महत्त्वाचे असते. हिच गोष्ट आज RCB विसरली. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या जोडीनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाला पहिल्या विकेटसाठी १११ धावा जोडून दिल्या. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ( CSK) RCBच्या फलंदाजांची ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. पहिल्या १० षटकांत ९० धावा करूनही RCBला १५६ धावांपर्यंतच मजल मारता आली, म्हणजे अखेरच्या १० षटकांत त्यांनी फक्त ६६ धावा केल्या आणि त्यात ६ विकेट्स गमावल्या.

विराट-देवदत्तची १११ धावांची भागादीर ड्वेन ब्राव्होनं मोडली. विराट ४१ चेंडूंत ६  चौकार व १ षटकार खेचून ५३ धावांवर रवींद्र जडेजाच्या हाती झेल देऊन माघारी परतला. महेंद्रसिंग धोनीनं इथूनच सामना फिरवण्यास सुरुवात केली.  त्यानंतर शार्दूल ठाकूरनं सलग दोन चेंडूंत विकेट घेत RCBवरील दडपण वाढवलं. शार्दूलनं १७व्या षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूंवर एबी डिव्हिलियर्स ( १२) व देवदत्त यांना बाद केले. देवदत्त ५० चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ७० धावा करून माघारी परतला. दीपक चहरनं पदार्पणवीर टीम डेव्हिडला माघारी पाठवले. ड्वेन ब्राव्होनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या आणि धोनीचा विश्वास पुन्हा एकदा सार्थ ठरवला.

प्रत्युत्तरात ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी CSKलाही चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या पॉवरप्लेमध्ये बिनबाद ५९ धावा जोडल्या. या आयपीएलमधील CSKची ही पॉवर प्लेमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. ९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चहलनं CSKला धक्का दिला. विराटनं अफलातून झेल टिपून ऋतुराजला ३८ धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानंतर फॅफही ( ३१) मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. 

पाहा व्हिडीओ..


 

Web Title: IPL 2021, CSK vs RCB Live Updates: What a catch from Virat Kohli to end a good partnership between Ruturaj Gaikwad and Faf Du Plessis, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app