IPL 2021, CSK vs RCB Live : शार्दूल ठाकूरनं फिरवला सामना, ड्वेन ब्राव्होनंही दिली साथ; CSKचं दमदार पुनरागमन

विराट व देवदत्तनं RCBला अपेक्षित सुरुवात करून दिली. विराटनं २०१९नंतर प्रथमच आयपीएलमधील पहिल्या षटकात दौन चौकार खेचले. यापूर्वी २०१९मध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्या षटकातील पाचव्या व सहाव्या चेंडूवर त्यानं चौकार खेचले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 09:25 PM2021-09-24T21:25:11+5:302021-09-24T21:29:51+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, CSK vs RCB Live Updates: 90 for 0 from 10 overs to 156 for 6 from 20 overs,  this terrific comeback by CSK | IPL 2021, CSK vs RCB Live : शार्दूल ठाकूरनं फिरवला सामना, ड्वेन ब्राव्होनंही दिली साथ; CSKचं दमदार पुनरागमन

IPL 2021, CSK vs RCB Live : शार्दूल ठाकूरनं फिरवला सामना, ड्वेन ब्राव्होनंही दिली साथ; CSKचं दमदार पुनरागमन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या जोडीनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाला दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या षटकापासून आक्रमक खेळ केला, विराटला फॉर्मात परतलेलं पाहून त्याचे पाठीराखेही भलतेच खूश झाले होते. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १११ धावा जोडून विक्रमाची नोंद केली. CSKविरुद्ध RCBच्या खेळाडूंनी केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. पण, पहिल्या १० षटकांत सुसाट पळालेली RCBची गाडी दुसऱ्या टप्प्यात अडखळली अन् त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. 

 प्रतीक्षा लांबली... अवघ्या १३ धावांनी विराट कोहलीला विश्वविक्रमानं आज हुलकावणी दिली 

विराट व देवदत्तनं RCBला अपेक्षित सुरुवात करून दिली. विराटनं २०१९नंतर प्रथमच आयपीएलमधील पहिल्या षटकात दौन चौकार खेचले. यापूर्वी २०१९मध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्या षटकातील पाचव्या व सहाव्या चेंडूवर त्यानं चौकार खेचले होते. आज त्यानं दीपक चहरच्या पहिल्या दोन चेंडूवर हा पराक्रम केला. विराट व देवदत्त यांनी पॉवरप्लेमध्येच अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. विराटनं पॉवरप्लेमध्ये २१ चेंडूंत ३३ धावा चोपल्या आणि पॉवरप्लेमधील ही त्याची दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. २०१३मध्ये त्यानं CSK विरुद्धच २१ चेंडूंत ३९* धावा केल्या होत्या.  

त्यात विराटनं CSKचा गोलंदाज शार्दूल ठाकूर याच्या गोलंदाजीवर मारलेला खणखणीत षटकार म्हणजे सोने पे सुहागा... शार्दूलनं टाकलेला चेंडू उत्तुंग टोलवल्यानंतर विराटनं त्याकडे पाहलेही नाही, त्याला आत्मविश्वास होता की तो चेंडू सीमारेषेपार जाईल. विराटनं मारलेला हा षटकार स्टेडियमबाहेर गेला. या दोघांनी चेन्नईविरुद्ध RCBकडून कोणत्याही विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी केली. यापूर्वी २०१२मध्ये ख्रिस गेल व विराट यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०९ धावा जोडल्या होत्या. विराट-देवदत्तची १११ धावांची भागादीर ड्वेन ब्राव्होनं मोडली. विराट ४१ चेंडूंत ६  चौकार व १ षटकार खेचून ५३ धावांवर रवींद्र जडेजाच्या हाती झेल देऊन माघारी परतला. 


बंगलोरनं १५ षटकांत १ बाद ११८ धावा केल्या होत्या. विराट व ड्वेन हे २००९पासून एकमेकांविरुद्ध २३ आयपीएल सामने खेळले आणि १७.१ षटकानंतर ड्वेननं प्रथमच त्याची विकेट घेतली. दुसऱ्या टप्प्यात RCBच्या धावांचा वेग मंदावला आणि त्यात शार्दूल ठाकूरनं सलग दोन चेंडूंत विकेट घेत त्यांच्यावरील दडपण वाढवले. शार्दूलनं १७व्या षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूंवर एबी डिव्हिलियर्स ( १२) व देवदत्त यांना बाद केले. देवदत्त ५० चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ७० धावा करून माघारी परतला. ( Shardul Thakur does it for CSK. Two in two for him, first AB De Villiers and now Devdutt Padikkal) त्यानतंर दीपक चहरनं पदार्पणवीर टीम डेव्हिडला माघारी पाठवले. बंगलोरला अखेरच्या १० षटकांत ६६ धावा करता आल्या आणि त्यांनी ६ फलंदाज गमावले.

 

Web Title: IPL 2021, CSK vs RCB Live Updates: 90 for 0 from 10 overs to 156 for 6 from 20 overs,  this terrific comeback by CSK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.