Join us  

IPL 2021: सर जडेजाच्या तुफान बॅटिंगनं धोनीच्या पत्नीचे डोळे दिपले, म्हणाली...

IPL 2021, Ravindra Jadeja: आयपीएलमध्ये रविवारी चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजानं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Banglore) विरुद्धचा सामना अक्षरश: गाजवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 10:54 AM

Open in App

IPL 2021, Ravindra Jadeja: आयपीएलमध्ये रविवारी चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजानं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Banglore) विरुद्धचा सामना अक्षरश: गाजवला. जडेजानं फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिनही क्षेत्रात कमालीची कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. बंगलोच्या हर्षल पटेलच्या शेवटच्या षटकात तर जडेजानं तुफान फटकेबाजीनं क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. जडेजानं हर्षल पटेलच्या एकाच षटकात तब्बल ३७ धावा वसुल केल्या. या षटकात जडेजानं ५ उत्तुंग षटकार ठोकले. 

IPL 2021: 'माझे कुटुंब कोरोनाच्या संकटात, आयपीएल सोडतोय', आर.अश्विनची स्पर्धेतून माघार

सर जडेजाच्या या खेळीचं सर्वांकडून कौतुक केलं जातंय. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीही याला कशी अपवाद असू शकेल. साक्षी धोनीनंही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर करत जडेजाच्या बॅटिंगला सलाम ठोकला आहे. (IPL 2021 CSK vs RCB MS Dhoni Wife Sakshi Dhoni Salute Ravindra Jadeja Batting Performance)

होय, एकट्या रवींद्र जडेजानं आम्हाला पराभूत केलं; CSKच्या खेळाडूचं विराट कोहलीकडून कौतुक

रवींद्र जडेजानं २० व्या षटकात सुरू केलेला षटकारांचा पाऊस पाहून अनेकांचे डोळे दिपले. साक्षी धोनीनं खास जडेजासाठी एक इन्स्टास्टोरी शेअर केलीय आणि सर रवींद जडेजा बिस्ट मोड, असं कॅप्शन दिलं आहे. 

जडेजानं बंगलोरला हरवलंरवींद्र जडेजानं सामन्याच्या २० व्या षटकात तब्बल ३७ धावा कुटल्या. त्याचसोबत गोलंदाजीतही कमाल दाखवली. जडेजानं बंगलोरच्या वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हिलियर्स या प्रमुख फलंदाजांची विकेट काढली. याशिवाय डॅनिअल ख्रिश्चन याला धावचीत केलं. त्यामुळे कोहली ब्रिगेडला चेन्नई सुपरकिंग्जनं नव्हे, तर एकट्या जडेजानं हरवलं असं म्हणायला हरकत नाही.  

टॅग्स :आयपीएल २०२१रवींद्र जडेजाचेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनी