IPL 2021, CSK vs RCB Live : विराट कोहलीनं खणखणीत षटकार खेचला, 'लॉर्ड' शार्दूलचा चेंडू स्टेडियमबाहेर टोलावला, Video 

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या जोडीनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाला दमदार सुरूवात करून दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 08:29 PM2021-09-24T20:29:12+5:302021-09-24T20:29:53+5:30

IPL 2021, CSK vs RCB Live Updates: Out of the Sharjah ground, what a hit from Virat Kohli, Watch Video  | IPL 2021, CSK vs RCB Live : विराट कोहलीनं खणखणीत षटकार खेचला, 'लॉर्ड' शार्दूलचा चेंडू स्टेडियमबाहेर टोलावला, Video 

IPL 2021, CSK vs RCB Live : विराट कोहलीनं खणखणीत षटकार खेचला, 'लॉर्ड' शार्दूलचा चेंडू स्टेडियमबाहेर टोलावला, Video 

Next

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या जोडीनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाला दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या षटकापासून आक्रमक खेळ केला, विराटला फॉर्मात परतलेलं पाहून त्याचे पाठीराखेही भलतेच खूश झाले होते. त्यात विराटनं CSKचा गोलंदाज शार्दूल ठाकूर याच्या गोलंदाजीवर मारलेला खणखणीत षटकार म्हणजे सोने पे सुहागा... शार्दूलनं टाकलेला चेंडू उत्तुंग टोलवल्यानंतर विराटनं त्याकडे पाहलेही नाही, त्याला आत्मविश्वास होता की तो चेंडू सीमारेषेपार जाईल. विराटनं मारलेला हा षटकार स्टेडियमबाहेर गेला... 

IPL 2021, CSK vs RCB Live : विराट कोहलीच्या नव्या भीडूनं मैदानावर उतरण्यापूर्वीच इतिहास रचला, CSKला घाम फुटला!

गुणतक्त्यात CSK १२ गुणांसह दुसऱ्या, तर RCB १० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या २७ सामन्यांत RCBला फक्त ९ वेळा विजय मिळवता आला आहे, तर CSK नं १७ सामने जिंकलेत. १ सामना अनिर्णीत राहिलाय. चेन्नईच्या संघात कोणताच बदल करण्यात आलेला नाही. अंबाती रायुडू आजचा सामना खेळण्यासाठी तंदुरूस्त आहे. बंगलोरच्या संघात दोन बदल पाहायला मिळत आहेत.( RCB have made two changes. Navdeep Saini back for Sachin Baby. Tim David replaces Kyle Jamieson. CSK are playing with same playing XI.) 

विराट व देवदत्तनं RCBला अपेक्षित सुरुवात करून दिली. विराटनं २०१९नंतर प्रथमच आयपीएलमधील पहिल्या षटकात दौन चौकार खेचले. यापूर्वी २०१९मध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्या षटकातील पाचव्या व सहाव्या चेंडूवर त्यानं चौकार खेचले होते. आज त्यानं दीपक चहरच्या पहिल्या दोन चेंडूवर हा पराक्रम केला. विराट व देवदत्त यांनी पॉवरप्लेमध्येच अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. विराटनं पॉवरप्लेमध्ये २१ चेंडूंत ३३ धावा चोपल्या आणि पॉवरप्लेमधील ही त्याची दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. २०१३मध्ये त्यानं CSK विरुद्धच २१ चेंडूंत ३९* धावा केल्या होत्या.  

पाहा व्हिडीओ..


 

Web Title: IPL 2021, CSK vs RCB Live Updates: Out of the Sharjah ground, what a hit from Virat Kohli, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app