Join us  

IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : महेंद्रसिंग धोनी पहिल्यासारखा राहिला नाही, CSKला यशस्वी व्हायचं असेल तर...; गौतम गंभीरचं मोठं विधान

IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ( MS Dhoni)  चेन्नई सुपर किंग्सचा संघ ( Chennai Super Kings) आज पंजाब किंग्सचा ( Punjab Kings) सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 3:08 PM

Open in App

IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ( MS Dhoni)  चेन्नई सुपर किंग्सचा संघ ( Chennai Super Kings) आज पंजाब किंग्सचा ( Punjab Kings) सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. दिल्ली कॅपिटल्सनं ( DC) पहिल्या सामन्यात CSKच्या गोलंदाजांना उघडे पाडले होते. DCनं तो १८९ धावांचे लक्ष्य ७ विकेट्स राखून सहज पार केले होते. त्यामुळे PBKSच्या तगड्या फलंदाजांसमोर आज CSKच्या गोलंदाजांची खरी कसोटी लागणार आहे. पण, या सामन्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार गौतम गंभीर ( Gautam Gambhir) यानं मोठं विधान केलं आहे. IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update

चेन्नई सुपर किंग्सा यूएईत पार पडलेल्या आयपीएल २०२०त साजेशी कामगिरी करता आली नव्हती. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच धोनीचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला नव्हता. त्यांना सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. पण, या नव्या पर्वात चेन्नई धडाकेबाज कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत. पहिल्या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, परंतु गोलंदाजांना अपयश आलं. महेंद्रसिंग धोनीला खातेही उघडता आले नव्हते.  

धोनीच्या याच कामगिरीबद्दल गंभीर म्हणाला,''आम्ही सातत्यानं याच गोष्टीवर चर्चा करतोय की, कर्णधारानं पुढे येऊन जबाबदारी उचलायला हवी. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन, तुम्ही नेतृत्व नाही करू शकत. धोनीनं वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येणं अपेक्षित आहे आणि संघहितासाठी ते महत्त्वाचे आहे. चार-पाच वर्षांपूर्वीचा धोनी अन् आताचा धोनी याच फरक आहे. तेव्हा तो मैदावर उतरताच गोलंदाजांमध्ये दहशत निर्माण व्हायची.''

''धोनीनं चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवं. चेन्नई आज त्यांचा दुसरा सामना पंजाब किंग्सविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात धोनी काय रणनीती आखतो, हे पाहणे उत्सुकतेचं ठरेल. चेन्नईसाठी त्यांची गोलंदाजी डोकेदुखी ठरत आहे. दिल्ली विरुद्ध १८८ धावांचा डोंगर उभा करूनही त्यांना ७ विकेट्सनं पराभव पत्करावा लागला होता.''  ipl 2021 t20 CSK vs PBKS live match score updates Mumbai

टॅग्स :आयपीएल २०२१महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सपंजाब किंग्सगौतम गंभीर