Join us  

IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : महेंद्रसिंग धोनीसाठी ए आर रेहमाननं डेडिकेट केलं 'भन्नाट' गाणं, सुरेश रैनासाठी 'मांगता है क्या'!

IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update : स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाईव्हमध्ये रहमान बोलत होता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 3:38 PM

Open in App

IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ( MS Dhoni)  चेन्नई सुपर किंग्सचा संघ ( Chennai Super Kings) आज पंजाब किंग्सचा ( Punjab Kings) सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. दिल्ली कॅपिटल्सनं ( DC) पहिल्या सामन्यात CSKच्या गोलंदाजांना उघडे पाडले होते. DCनं तो १८९ धावांचे लक्ष्य ७ विकेट्स राखून सहज पार केले होते. त्यामुळे PBKSच्या तगड्या फलंदाजांसमोर आज CSKच्या गोलंदाजांची खरी कसोटी लागणार आहे. ऑक्सर विजेता संगीतकार ए आर रहमान ( AR Rahman) यानं महेंद्रसिंग धोनीसाठी लगान चित्रपटातील 'चले चलो' हे गाणं डेडिकेट केलं आहे. सुरेश रैनासाठी रंगिला चित्रपटातील 'मांगता है क्या' हे गाणं समर्पीत केलं आहे. IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update

स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाईव्हमध्ये रहमान बोलत होता,''लगान चित्रपटातील चले चलो हे गाणं मी महेंद्रसिंग धोनीला समर्पीत करतो. त्यानं लोकांना एकत्र येऊन क्रिकेट खेळण्याची प्रेरणा दिली. सुरेश रैनासाठी मांगता है क्या हे गाणं डेलिकेट करेन. कारण, मी जेव्हा जेव्हा बंगलोरला जातो, तेव्हा तिथली लोकं रंगिला चित्रपटातील हे गाणं अधिक एकतात.''   महेंद्रसिंग धोनी पहिल्यासारखा राहिला नाही, CSKला यशस्वी व्हायचं असेल तर...; गौतम गंभीरचं मोठं विधान  या कार्यक्रमाला भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरही होता. तो म्हणाला,''आम्ही सातत्यानं याच गोष्टीवर चर्चा करतोय की, कर्णधारानं पुढे येऊन जबाबदारी उचलायला हवी. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन, तुम्ही नेतृत्व नाही करू शकत. धोनीनं वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येणं अपेक्षित आहे आणि संघहितासाठी ते महत्त्वाचे आहे. चार-पाच वर्षांपूर्वीचा धोनी अन् आताचा धोनी याच फरक आहे. तेव्हा तो मैदावर उतरताच गोलंदाजांमध्ये दहशत निर्माण व्हायची.''

टॅग्स :आयपीएल २०२१महेंद्रसिंग धोनीए. आर. रहमानचेन्नई सुपर किंग्स