Join us  

IPL 2021, CSK vs KKR T20 Match Highlight : वानखेडेवर क्रिकेटचा थरार रंगला, आंद्रे रसेलच्या विकेटनं सामनाच फिरला...

IPL 2021  t20 Csk vs KKR live match score updates mumbai : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटमधील खरा थरार अनुभवायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 11:44 PM

Open in App

IPL 2021  t20 Csk vs KKR live match score updates mumbai : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटमधील खरा थरार अनुभवायला मिळाला. चेन्नई सुपर किंग्सनं २२० धावांचा डोंगर उभा केल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा निम्मा संघ ३१ धावांवर माघारी परतला. तेथून कोणताच संघ कमबॅक करणं अवघडचं होतं, पण आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक आणि पॅट कमिन्स यांनी खिंड लढवली अन् अखेरच्या षटकापर्यंत सामना नेला. वानखेडेवर आज २६ षटकार व ३५ चौकारांचा आतषबाजी झाली. पॅट कमिन्सनं CSKचा घाम काढला; तरीही रोमहर्षक सामन्यात MS Dhoniचा संघ जिंकला

IPL 2021, CSK vs KKR T20 Match Highlight : 

  • मागील तीन सामन्यांत अपयशी ठरलेल्या ऋतुराज गायकवाडनं आज चांगली सुरुवात करून दिली. त्यानं फॅफ ड्यू प्लेसिससह पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. ऋतुराज ४२ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावांवर बाद झाला. मोईन अलीनं फॅफसह दुसऱ्या विकेटसाठी २७ चेंडूंत ४६ धावांची भागीदारी केली. अली १२ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून २५ धावांवर बाद झाला.  
  • महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आज फलंदाजीला चौथ्या क्रमांकावर आला. धोनी ८ चेंडूंत २ चौकार व १ षटकार खेचून १७ धावांवर माघारी परतला. १९व्या षटकात आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर कर्णधार इयॉन मॉर्गननं अप्रतिम झेल टिपला. फॅफनं अखेरच्या षटकात फटकेबाजी कायम राखताना चेन्नईला २० षटकांत ३ बाद २२० धावांचा डोंगर उभा करून दिला. फॅफ ६० चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारासह ९५ धावांवर नाबाद राहिला. 
  • महेंद्रसिंग धोनीनं स्वतःचं केलेलं प्रमोशन सुखावणारं होतं. त्याचा षटकार पाहण्यासाठी आसुसलेल्या नयनांना आज आनंद मिळाला. धोनी पुढील सामन्यांतही चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यास आश्चर्य वाटायला नको. 
  • २२० धावांचे ओझे कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांना पेलवलं नाही. शुबमन गिल ( ०), नितीश राणा ( ९), कर्णधार इयॉन मॉर्गन (७) व सुनील नरीन ( ४) यांना दीपक चहरनं बाद करून कहर केला. त्यानं ४ षटकांत २९ धावांवर ४ विकेट्स घेतल्या. आयपीएल २०२१त पहिलाच सामना खेळणाऱ्या लुंगी एनगिडीनं राहुल त्रिपाठीला बाद करून कोलकाताचा निम्मा संघ ३१ धावांत माघारी परतला होता. 
  • निम्मा संघ ३१ धावांवर माघारी परतल्यानंतर दिनेश कार्तिक व आंद्रे रसेल ही जोडी CSKच्या गोलंदाजांना भिडली. रसेलनं २१ चेंडूंत अर्धशतक झळकावले. यंदाच्या आयपीएलमधील हे दुसरे जलद अर्धशतक ठरले. पंजाब किंग्सच्या दीपक हुडानं २० चेंडूंत अर्धशतक झळकावले होते.
  • सॅम कुरननं १२ व्या षटकात रसेलची विकेट घेतली. रसेलनं २२ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह ५४ धावा केल्या. रसेलची ही विकेट KKRसाठी वेदनादायी ठरली. कुरनचा डाव्या बाजूनं जाणार चेंडू सोडणं रसेलला महागात पडलं अन् त्याचा त्रिफळा उडाला. दिनेश कार्तिक २४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४० धावांवर लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर माघारी फिरला. इथे कोलकातानं सामना गमावला होता. 
  • पण, पॅट कमिन्सनं अनपेक्षित फटकेबाजी करून KKRची झुंज कायम राखली. त्यानं सॅम कुरननं टाकलेल्या १६ व्या षटकात २, ६, ६, ६, ६, ४, ६ अशा ३० धावा चोपून काढल्या. त्यानं २३ चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्यानं चेन्नईच्या गोलंदाजांचा घाम काढला. अखेरच्या षटकात २० धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर दोन धाव घेताना KKRनं अखेरचा फलंदाज गमावला. पॅट कमिन्स ३४ चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला. 
  • १८व्या षटकात कमिन्सनं एकेरी धाव घेण्यास दिलेला नकार, वरुण चक्रवर्थी व प्रसिद्ध कृष्णा यांचे धावबाद होणे, KKRला महागात पडले. ते तसे झाले नसते तर कदाचित कमिन्सनं हा सामना जवळपास खेचूनच आणला होता. 
टॅग्स :आयपीएल ट्वेंटी-20 मॅच हायलाईट्सआयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्स