IPL 2021, CSK vs KKR T20 : पॅट कमिन्सनं CSKचा घाम काढला; तरीही रोमहर्षक सामन्यात MS Dhoniचा संघ जिंकला

IPL 2021  t20 Csk vs KKR live match score updates mumbai : दीपक चहरनं पुन्हा एकदा कहर केला आणि त्यानं चार विकेट्स घेत KKRला जबरदस्त धक्के दिले. चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) २२० धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची अवस्था ५ बाद ३१ अशी दयनीय झाली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 11:21 PM2021-04-21T23:21:47+5:302021-04-21T23:23:00+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, CSK vs KKR T20: CSK beat KKR by 18 runs, what a crazy match and 3rd consecutive win for men in yellow in IPL2021 | IPL 2021, CSK vs KKR T20 : पॅट कमिन्सनं CSKचा घाम काढला; तरीही रोमहर्षक सामन्यात MS Dhoniचा संघ जिंकला

IPL 2021, CSK vs KKR T20 : पॅट कमिन्सनं CSKचा घाम काढला; तरीही रोमहर्षक सामन्यात MS Dhoniचा संघ जिंकला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021  t20 Csk vs KKR live match score updates mumbai : दीपक चहरनं पुन्हा एकदा कहर केला आणि त्यानं चार विकेट्स घेत KKRला जबरदस्त धक्के दिले. चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) २२० धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची अवस्था ५ बाद ३१ अशी दयनीय झाली होती. त्यानंतर आंद्रे रसेल ( Andre Russell ) मैदानावर आला अन् वादळासारखा घोंगावला. रसेलनं यंदाच्या आयपीएलमधील दुसरे जलद अर्धशतक झळकावले. दिनेश कार्तिकही दमदार खेळ करत होता, पण त्याची विकेट पडल्यानंतर KKRचा डाव संपेल असे वाटले. मात्र, पॅट कमिन्सनं अनपेक्षित फटकेबाजी करून सामन्यातील चुरस कायम राखली. त्यानंही २३ चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्यानं चेन्नईच्या गोलंदाजांचा घाम काढला. अखेरच्या षटकात २० धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर दोन धाव घेताना KKRनं अखेरचा फलंदाज गमावला. पॅट कमिन्स ३४ चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला. IPL 2021 : CSK vs KKR T20 Live Score Update
 
दीपक चहरचा कहर...

२२० धावांचे ओझे कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांना पेलवलं नाही. शुबमन गिल ( ०), नितीश राणा ( ९), कर्णधार इयॉन मॉर्गन (७) व सुनील नरीन ( ४) यांना दीपक चहरनं बाद करून कहर केला. त्यानं ४ षटकांत २९ धावांवर ४ विकेट्स घेतल्या. आयपीएल २०२१त पहिलाच सामना खेळणाऱ्या लुंगी एनगिडीनं राहुल त्रिपाठीला बाद करून कोलकाताचा निम्मा संघ ३१ धावांत माघारी परतला होता. पण, विकेट पडल्यानंतरही KKRच्या धावांची गती CSKसाठी चिंताजनक होती. CSK vs KKR, CSK vs KKR live score, IPL 2021


आंद्रे रसेलची आतषबाजी...
निम्मा संघ ३१ धावांवर माघारी परतल्यानंतर दिनेश कार्तिक व आंद्रे रसेल ही जोडी CSKच्या गोलंदाजांना भिडली. रसेलनं २१ चेंडूंत अर्धशतक झळकावले. यंदाच्या आयपीएलमधील हे दुसरे जलद अर्धशतक ठरले. पंजाब किंग्सच्या दीपक हुडानं २० चेंडूंत अर्धशतक झळकावले होते.  पण, सॅम कुरननं १२ व्या षटकात रसेलची विकेट घेतली. रसेलनं २२ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह ५४ धावा केल्या. रसेलची ही विकेट KKRसाठी वेदनादायी ठरली. कुरनचा डाव्या बाजूनं जाणार चेंडू सोडणं रसेलला महागात पडलं अन् त्याचा त्रिफळा उडाला. IPL 2021 latest news, CSK vs KKR IPL Matches

पॅट कमिन्सची अविश्वसनीय खेळी, पण...
दिनेश कार्तिक २४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४० धावांवर लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर माघारी फिरला. पण, पॅट कमिन्सनं अनपेक्षित फटकेबाजी करून KKRची झुंज कायम राखली. त्यानं सॅम कुरननं टाकलेल्या १६ व्या षटकात २, ६, ६, ६, ६, ४, ६ अशा ३० धावा चोपून काढल्या. त्यामुळे चेंडू व धावांचे अंतर कमी झाले. १७व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कमलेश नागरकोटी ( ०) माघारी परतला. अखेरच्या १८ चेंडूंत KKR ला ४० धावा बनवायच्या होत्या. शार्दूल ठाकूरनं टाकलेल्या १८व्या षटकात १२ धावा आल्या. धोनीनं कुरनला पुन्हा गोलंदाजीला बोलावलं आणि पहिला चेंडू डॉट खेळल्यानंतर पॅट कमिन्सनं खणखणीत षटकार खेचला. तिसऱ्या चेंडूवर दोन धाव घेताना वरुण चक्रवर्थी धावबाद झाला. अखेरच्या षटकात २० धावांची गरज असताना कमिन्स स्ट्राईकवर होता. KKR ला २०२ धावांवर समाधान मानावे लागले. चेन्नईनं १८ धावांनी विजय मिळवला. CSK vs KKR Live Score, IPL 2021 CSK vs KKR, CSK vs KKR Live Match


 
ऋतुराजचा फॉर्म परतला...
मागील तीन सामन्यांत अपयशी ठरलेल्या ऋतुराज गायकवाडनं आज चांगली सुरुवात करून दिली. त्यानं फॅफ ड्यू प्लेसिससह पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. ऋतुराज ४२ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावांवर बाद झाला. मोईन अलीनं फॅफसह दुसऱ्या विकेटसाठी २७ चेंडूंत ४६ धावांची भागीदारी केली. अली १२ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून २५ धावांवर बाद झाला. IPL 2021 latest news, CSK vs KKR IPL Matches

फॅफ ड्यू प्लेसिस ९५ धावांवर नाबाद...
महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आज फलंदाजीला चौथ्या क्रमांकावर आला. धोनी ८ चेंडूंत २ चौकार व १ षटकार खेचून १७ धावांवर माघारी परतला. १९व्या षटकात आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर कर्णधार इयॉन मॉर्गननं अप्रतिम झेल टिपला. फॅफनं अखेरच्या षटकात फटकेबाजी कायम राखताना चेन्नईला २० षटकांत ३ बाद २२० धावांचा डोंगर उभा करून दिला. फॅफ ६० चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारासह ९५ धावांवर नाबाद राहिला. CSK vs KKR IPL match 2021, CSK vs KKR T20 Match

Web Title: IPL 2021, CSK vs KKR T20: CSK beat KKR by 18 runs, what a crazy match and 3rd consecutive win for men in yellow in IPL2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.