Join us  

IPL 2021, CSK vs DC : चेन्नई सुपर किंग्स जिंकावा म्हणून प्रार्थना करत होती धोनीची कन्या जिवा, साक्षीची होती अशी reaction

CSKनं १३५ धावा करूनही DCला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. १८व्या षटकात कृष्णप्पा गौथमनं झेल सोडला नसता तर कदाचित सामन्याचा निकाल CSKच्या बाजूनं लागला असता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 12:18 AM

Open in App

IPL 2021, Delhi Capitals vs Chennai Super Kings : दिल्ली कॅपिटल्सनं ( DC) सोमवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सवर ( CSK) तीन विकेट्स राखून विजय मिळवताना गुणतालिकेत २० गुणांसह अव्वल स्थान काबीज केले. CSKनं १३५ धावा करूनही DCला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. १८व्या षटकात कृष्णप्पा गौथमनं झेल सोडला नसता तर कदाचित सामन्याचा निकाल CSKच्या बाजूनं लागला असता. पण, या सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनीची कन्या जिवा हिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. MS Dhoniचा संघ जिंकावा यासाठी जिवा हात जोडून प्रार्थना करताना दिसली आणि तिला असं पाहून साक्षीची रिअॅक्शन भारी होती.

फॅफ ड्यू प्लेसिस (१०) व ऋतुराज गायकवाड ( १३ ) ही जोडी पहिल्यांदा पॉवर प्लेमध्ये माघारी परतली. महेंद्रसिंग धोनी व अंबाती रायुडू यांनी चेन्नईचं विकेट पडणे थांबवले, परंतु त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. धोनी २७ चेंडूंत १८ धावा करून बाद झाला, तर रायुडू ४३ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईला ५ बाद १३६ धावांवरच समाधान मानावे लागले.

पृथ्वी शॉ  १८ धावांवर माघारी परतला. श्रेयस अय्यर ( २) व रिषभ पंत ( १५) हेही अपयशी ठरले. लक्ष्य मोठं नसल्यानं दिल्लीवर एवढं दडपण जाणवत नव्हते. पण, १५ व्या षटकात शार्दूल ठाकूरनं DCला दणके दिले. पहिल्या चेंडूवर त्यानं आर अश्विनला ( २) आणि  अखेरच्या चेंडूवर शिखरला ( ३९ धावा ) बाद करून दिल्लीची अवस्था ६ बाद ९९ अशी केली.  दिल्लीला तीन षटकांत २८ धावा करायच्या होत्या. तेव्हा धोनीनं त्याचा ट्रम्प कार्ड ड्वेन ब्राव्होला मैदानावर उतरवले. त्यानं अक्षर पटेलची विकेट घेतली खरी, परंतु CSKला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. 

दिल्लीला विजयासाठी १९ चेंडूंत २९ धावांची गरज असताना जिवा प्रार्थना करताना दिसली.

टॅग्स :आयपीएल २०२१जीवा धोनीचेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App