Join us

IPL 2021, CSK vs DC Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिस नसता तर अम्पायरच्या चुकीचा निर्णयाचा ऋतुराज गायकवाडला फटका बसला असता

IPL 2021, Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Updates : उभय संघांमध्ये जय-पराजयाचे पारडे हे चेन्नईच्या बाजूनं १५-७ असा आहे. दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 19:52 IST

Open in App

IPL 2021, Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Updates : आयपीएलच्या मागील पर्वात गाशा गुंडाळणारा पहिला संघ ते आयपीएल 2021मध्ये प्ले ऑफचं तिकिट पक्कं करण्याचा पहिला मान... चेन्नई सुपर किंग्सची ( CSK) ही भरारी चाहत्यांना सुखावणारी आहे. महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली CSKनं दमदार कामगिरी केली आहे आणि आज त्यांचा सामना आणखी एका दमदार कामगिरी करणाऱ्या संघाशी म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सशी ( DC) आहे. उभय संघांमध्ये जय-पराजयाचे पारडे हे चेन्नईच्या बाजूनं १५-७ असा आहे. दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. CSKनं आज सुरेश रैनाला बाकावर बसवून रॉबीन उथप्पाला पदार्पणाची संधी दिली आहे. रैनाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे.

आजच्या सामन्यात दिल्लीनं स्टीव्ह स्मिथच्या जागी गुजराजच्या रिपाल पटेलला पदार्पणाची संधी दिली, तर चेन्नईनं सॅम कुरन, आसीफ व रैना यांच्या जागी ड्वेन ब्राव्हो, दीपक चहर व रॉबीन उथप्पा यांना खेळवले आहे. मागच्या सामन्यातील शतकवीर ऋतुराज याला पहिल्याच षटकात अम्पायरच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला असता, परंतु फॅफमुळे त्याची विकेट वाचली. अॅनरिच नॉर्ट्जे यानं टाकलेला पहिलाच चेंडू सुसाट वळला अन् यष्टींच्या वरून रिषभ पंतच्या हाती विसावला, दुसरा चेंडू मात्र दिशाहीन राहिला आणि डावीकडून तो Wide ठरत सीमारेषेपार गेला. 

त्यापुढील चेंडू ऋतुराजच्या पॅडवर आदळला आणि जोरदार अपील झाले. अम्पायर अनील चौधरी यांनी त्याला LBW बाद दिले. त्यानंतर ऋतुराज नाराज झाला अन् अनुभवी फॅफकडे धावला. फॅफनं त्याला DRS घेण्यास सांगितले. त्यानंतर त्यात चेंडू यष्टींना चूकवत असल्याचे दिसले अन् ऋतुराज नाबाद राहिला. त्यानंतर दिल्लीच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरील आनंद उडाला. ऋतुराजनं पहिल्या षटकात १६ धावा कुटल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्सएफ ड्यु प्लेसीस
Open in App