Join us

IPL 2021 CSK vs DC: गुरू-शिष्य लढतीवर नजर; दिल्लीसमोर चेन्नईचं आव्हान

IPL 2021 CSK vs DC: तीन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स गेल्या वर्षी आठ संघांमध्ये सातव्या स्थानी होता. ही निराशाजनक कामगिरी विसरण्यासाठी आयपीएलचा दिग्गज संघ विजयासह सुरुवात करण्यास उत्सुक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 07:27 IST

Open in App

मुंबई : ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्समहेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघ शनिवारी आयपीएलच्या लढतीत ज्यावेळी आमने-सामने असतील त्यावेळी या लढतीचे ‘एक युवा शिष्य व त्याचा गुरू’ असे स्वरुप असेल. दिल्ली संघ यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या यापूर्वीच्या सत्रात उपविजेता होता. यावेळी जेतेपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचे लक्ष्य विजयासह सुरुवात करण्याचे असेल. तीन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स गेल्या वर्षी आठ संघांमध्ये सातव्या स्थानी होता. ही निराशाजनक कामगिरी विसरण्यासाठी आयपीएलचा दिग्गज संघ विजयासह सुरुवात करण्यास उत्सुक आहे.आमने-सामने २३ वेळाचेन्नई १५ तर दिल्ली ८ वेळा विजयी

टॅग्स :आयपीएल २०२१महेंद्रसिंग धोनीरिषभ पंतदिल्ली कॅपिटल्सचेन्नई सुपर किंग्स