Join us

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात नवा 'मलिंगा'; ट्रेनिंग कॅम्पमध्ये उडवली अनेकांची झोप

IPL 2021: CSK Add New Sri Lankan 'Malinga' चेन्नई सुपर किंग्सच्या वरिष्ठ खेळाडूंसह दोन युवा गोलंदाजही सरावाला लागले आहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 17:12 IST

Open in App

चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) संघानं इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाच्या तयारीला सुरूवात केली आहे. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni), अंबाती रायुडू, ऋतुराज गायकवाड आणि अन्य काही खेळाडू आधीच चेन्नईला सरावसत्रासाठी दाखल झाले आहेत. ९ एप्रिलपासून आयपीएलच्या १४ व्या पर्वाला सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स त्यांचा पहिला सामना १० एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर खेळणार आहेत. गतवर्षी यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये त्यांना तळाच्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं आणि यंदा ती कामगिरी सुधारून पुन्हा जेतेपद पटकावण्यासाठी ते सज्ज होत आहेत. 

चेन्नई सुपर किंग्सच्या वरिष्ठ खेळाडूंसह दोन युवा गोलंदाजही सरावाला लागले आहेत. महिश थिक्शाना आणि मथिशा पथिराणा या श्रीलंकन गोलंदाजांचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. दोन्ही अनकॅप खेळाडू CSKच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत आणि पथिराणा यानं सर्वांचे लक्ष वेधलं आहे. त्याची गोलंदाजीची शैली ही लसिथ मलिंगाच्या शैलीशी तंतोतंत मिळतीजुळती आहे. 

या गोलंदाजानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या यशस्वी जैस्वालला १७५Kphच्या वेगानं चेंडू टाकून आश्चर्यचकित केलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तो सर्वात वेगवाग चेंडू होता, परंतु एरर ऑफ जजमेंटमुळे हा विक्रम नाकारला गेला. शोएब अख्तरनं २००३च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लडविरुद्ध १६१.३ kmph वेगानं चेंडू फेकला होता.

  चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) - रिटेन खेळाडू : एमएस धोनी, सुरेश रैना, केएम आसिफ, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, मिशेल सैंटनर, आर. साई किशोर, लुंगी एनगिडी, रवींद्र जडेजा, नारायण जगदीशन, ऋतुराज गायकवाड़, जोश हेजलवुड, अंबाती रायडू, दीपक चाहर, फाफ डु प्लेसिस, शार्दूल ठाकुर, ड्वेन ब्राव्हो आणि सॅम कुरेन

लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- मोईन अली ( Moeen Ali) ७ कोटी, के गौतम ( K Gowtham) ९.२५ कोटी, चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujra) ५० लाख, हरिशंकर रेड्डी ( Harishankar Reddy) २० लाख, भगत वर्मा ( Bhagath Varma) २० लाख, हरि निशांत (Hari Nishanth) २० लाख.

टॅग्स :आयपीएलचेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनी