Join us

IPL 2021 : 'कोरोना संकटातही IPL सुरू, भारताला माझ्या शुभेच्छा'; अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या ट्वीटची चर्चा, नेटिझन्सनी दिलं उत्तर

देशात गेल्या चोवीस तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नवे रुग्ण आढळले. तर दिसभरात कोरोनामुळे २७६७ जणांचा मृत्यू झाला तसेच २ लाख १७ हजार ११३ रुग्ण बरे झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 15:24 IST

Open in App

देशात गेल्या चोवीस तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नवे रुग्ण आढळले. तर दिसभरात कोरोनामुळे २७६७ जणांचा मृत्यू झाला तसेच २ लाख १७ हजार ११३ रुग्ण बरे झाले आहेत. जगातील इतर देशांपेक्षा भारतात सर्वाधिक नवे रुग्ण सापडले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ६९ लाख झाली असून, त्यातील १ कोटी ४० लाख जण बरे झाले. या संसर्गाने आतापर्यंत १ लाख ९२ लाख जणांचा बळी घेतला आहे. देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २६ लाख ८२ हजार इतकी आहे. काही आठवड्यांमध्ये भारतीय रेल्वेचे ९३ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे. 

अशात देशात रेमडेसिवीर, ऑक्सिजनसह बेड्सची तुटवडा आहे. अनेक राज्यांमध्ये पुन्हा कठोर निर्बंध घातली गेली आहेत. अशा स्थितीतही भारतात आयपीएल खेळवली जात आहे. कोरोनाचा विस्फोट होत असताना आयपीएलचे सामन्यांनाही विरोध होताना दिसत आहे. त्यात ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टनं केलेल्या ट्विटनं पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला आहे. 

गिलख्रिस्टनं ट्विट केलं की,''भारताला माझ्या शुभेच्छा. भारतात कोरोना परिस्थिती भीतीदायक बनत चालली आहे. तरीही आयपीएल सुरू आहे. हे योग्य आहे का? की प्रत्येक रात्री लोकांचं मन विचतिल करण्यासाठीचं महत्त्वाची गोष्ट? तुमचं मत काही असो, माझ्या प्रार्थना तुमच्यासोबत आहेत.''

टॅग्स :आयपीएल २०२१कोरोना वायरस बातम्या